Join us

अष्टपैलू क्रिकेटपटू शंकर रहाटे यांचे निधन; ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भेदक डावखुरा गोलंदाज म्हणून त्यांची सिझन आणि टेनिसबॉल क्रिकेटमध्ये त्यांची ख्याती होती.

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 5, 2023 16:20 IST

Open in App

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याचे अष्टपैलू डावखुरे क्रिकेटपटू शंकर सयाजी रहाटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ठाण्यातील लोहार आळीत वास्तव्यास असणाऱ्या शंकर रहाटे यांनी शालेय जीवनात मो.ह.विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होते. चेंदणी कोळीवाड्यातील फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आणि लोहार आळी क्रिकेट संघातर्फे खेळताना त्यांनी आपली छाप पाडली होती. भेदक डावखुरा गोलंदाज म्हणून त्यांची सिझन आणि टेनिसबॉल क्रिकेटमध्ये त्यांची ख्याती होती.

लोहार आळी क्रिकेट संघात विधान परिषदेचे दिवंगत माजी उपसभापती, ठाण्याचे माजी महापौर वसंतराव डावखरे, सुरेश माशेरे हे त्याचे सहकारी होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया देताना फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे हरेश्वर मोरेकर म्हणाले, अमिर अहमदाबादी आणि शंकर रहाटे या लेगस्पिनर आमच्या संघासाठी विजय मिळवण्यासाठी मोठा वाटा उचलला होता. क्लबने एक बुजुर्ग क्रिकेटपटू गमावला.

टॅग्स :ऑफ द फिल्डमृत्यू
Open in App