Join us  

Kieron Pollard : किरॉन पोलार्डचा अविश्वसनीय झेल, संघासाठी षटकार अडवला अन् सामनाही फिरवला, Video 

Kieran Pollard unbelievable catch - किरॉन पोलार्डने शुक्रवारी कॅरेबिनय प्रीमिअर लीगमध्ये अविश्वसनीय झेल घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 6:40 PM

Open in App

Kieran Pollard unbelievable catch - किरॉन पोलार्डने शुक्रवारी कॅरेबिनय प्रीमिअर लीगमध्ये अविश्वसनीय झेल घेतला. CPL मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व पोलार्ड करतोय आणि गतवर्षीच्या उप विजेत्या सेंट ल्युसिया किंग्स विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने घेतलेल्या या अफलातून कॅचने सोशल मीडियावर हवा केली आहे. कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रमथ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किंग्सने १४३ धावा फलकावर चढवल्या. किंग्सच्या डावातील २०व्या षटकात पोलार्डने हा नेत्रदिपक झेल घेतला. अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवीर जायडेन सिल्सने खणखणीत फटका मारला. चेंडू सीमापार जाणार असे वाटत असताना पोलार्ड हवेत झेपावला अन् एका हातात अप्रतिम झेल टिपला.  

इंडियन प्रीमिअर लीगमध्येही पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून खेळताना असे भन्नाट झेल घेतले आहेत. नाइट रायडर्ससाठी त्याने घेतलेला हा कॅच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. पोलार्डच्या या कॅचने संघाच्या विजयाला हारभार लावला. नाइट रायडर्सने ३ विकेट्सने हा सामना जिंकला. पोलार्डने १७ धावाही केल्या. टीम वेबस्टरने ५८ धावांची खेळी केली. रायडर्सच्या अकिल होसैनने चार विकेट्स घेतल्या.  

पोलार्डने नुकताच एक विक्रम नावावर केला. पोलार्डने २००६मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने अनेक ट्वेंटी-२० लीगमध्ये सहभाग घेतला. त्याने मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचे नेतृत्व सांभाळले होते. परंतु त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. पण, तो फ्रँचायझी लीगमध्ये खेळतोय आणि त्याने मंगळवारी ६०० वा ट्वेंटी-२० सामना खेळला. ६०० ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आहे.  त्याने ६०० ट्वेंटी-२० सामन्यांत ५३३ डावांमध्ये ३१च्या सरासरीने ११७२३ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये पोलार्डने ७८० षटकार खेचले आहेत. त्याच्या नावावर ३०९ विकेट्सही आहेत. 

 

Kieron Pollard, ड्वेन ब्राव्हो व निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने UAE आणि दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये फ्रँचायझी खरेदी केल्यानंतर त्यांच्या संघातून कोण खेळणार याची सर्वांना उत्सुकता होती. 'MI Emiratescघाचं नाव 'MI Cape Town' असे असणार आहे. काल MI Cape Town संघाने त्यांच्या ५ प्रमुख खेळाडूंची नावे जाहीर केली. आज MI Emirates फ्रँचायझीने १४ सदस्यीय संघच जाहीर केला. 

टॅग्स :किरॉन पोलार्डकॅरेबियन प्रीमिअर लीग
Open in App