Join us  

CPL 2021 : वादळ आलं जी...! फॅफ ड्यू प्लेसिसची शतकी खेळी; १८ चेंडूंत कुटल्या ८२ धावा

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) २०२१च्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) आघाडीचा फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं खणखणीत खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 9:17 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) २०२१च्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) आघाडीचा फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं खणखणीत खेळी केली. कॅरेबिनय प्रीमिअर लीगमध्ये (  Caribbean Premier League) त्यानं रविवारी सेंट ल्युसिया किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना शतकी खेळी केली. CPL 2021मधील टेबल टॉपर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts and Nevis Patriots ) संघाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यानं ५१ चेंडूंत शतक पूर्ण करताना ११ चेंडूत ६८ धावा कुटल्या. ( Faf Du Plessis smashed hundred from 51 balls ) 

 

आंद्रे फ्लेचर व ड्यू प्लेसिस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. या दोघांनी ७.२ षटकांत दहाच्या सरासरीनं ७६ धावांची सलामी दिली. फॅबियन अॅलननं पॅट्रीओट्ससाठी पहिली विकेट घेतली. फ्लेचर १९ चेंडूंत १ चौकार व १ षटकार मारून २३ धावांवर माघारी परतला. केरॉन कॉटोय हा अवघ्या १० धावा करून बाद झाला. पण, फॅफ ड्यू प्लेसिस व रोस्टन चेस यांनी तुफान फटकेबाजी केली. ड्यू प्लेसिसनं ५१ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह शतक पूर्ण केलं. ड्यू प्लेसिस शतकानंतर सावध खेळू लागला कारण त्याला रोस्टन चेसही तुफान फटकेबाजीची संधी द्यायची होती. चेसही त्याच्या विश्वासावर खरा उतरला.

ड्यू प्लेसिस व चेस यांनी तिसऱ्या विकेट्ससाठी १२४ धावांची भागीदारी केली. कर्णधार ड्यू प्लेसिस ६० चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह १२० धावांवर नाबाद राहिला, तर चेस ३१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. किंग्स संघानं २० षटकांत २ बाद २२४ धावा केल्या. 

 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगएफ ड्यु प्लेसीस
Open in App