CPL 2021 : ड्वेन ब्राव्हो पाकिस्तानी फलंदाजाशी असं काही वागला की होतेय सर्वत्र चर्चा, Video

Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी खेळाडू सज्ज होत आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधून ( CPL 2021) हे खेळाडू सराव करून घेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:45 PM2021-08-28T22:45:21+5:302021-08-28T22:45:56+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2021 : Hafeez was out of the crease when dwayne Bravo was going to bowl and then he decided to stop but didint Mankad, Video | CPL 2021 : ड्वेन ब्राव्हो पाकिस्तानी फलंदाजाशी असं काही वागला की होतेय सर्वत्र चर्चा, Video

CPL 2021 : ड्वेन ब्राव्हो पाकिस्तानी फलंदाजाशी असं काही वागला की होतेय सर्वत्र चर्चा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी खेळाडू सज्ज होत आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधून ( CPL 2021) हे खेळाडू सराव करून घेत आहेत. शुक्रवारी आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड हा महत्त्वाच्या खेळाडूंनी तुफान फटकेबाजी करून IPLमधील आपापल्या फ्रँचायझीसाठी शुभसंकेत दिले. त्यात RCBनं करारबद्ध केलेल्या टीम डेव्हिडनंही CPLच्या पदार्पणाच्या सामन्यात ताबडतोड अर्धशतक झळकावले. शनिवारी चेन्नई सुपर किंग्सच्या ड्वेन ब्राव्होनं सर्वांचे लक्ष वेधले. पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिज याच्यासोबत तो असं काही वागला की ज्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली अन् त्याचे कौतुकही होऊ लागले.

EPLमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला ख्रिस्तियानो रोनाल्डो, पण मेस्सी, नेयमार आहेत पुढे!

गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स यांच्यातल्या सामन्यात हा प्रसंग घडला. गयाना वॉरियर्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. चंद्रपॉल हेमराज ( ३९), मोहम्मद हाफिज ( ३८*) व कर्णधार निकोलस पूरन ( २३) यांनी दमदार खेळ करताना ८ बाद १४६ धावा केल्या. यावेळी हाफिज नॉन स्ट्रायकर एंडवर असताना ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करत होता. ब्राव्होनं चेंडू टाकण्यापूर्वी हाफिजनं क्रिज सोडलं होतं, परंतु ब्राव्होन खिलाडूवृत्ती दाखवली अन् हाफिजला मंकडिंग केलं नाही. त्याची ही कृतीपाहून सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे. 

लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या चार खेळाडूंवर टांगती तलवार, विराट कोहली घेणार मोठा निर्णय!



प्रत्युत्तरात पॅट्रीओट्सच्या एव्हीन लुईसनं ३९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६२ धावांची खेळी केली. डेव्हॉन थॉमस ४३ धावांवर खेळत आहे. पॅट्रीओट्सला विजयासाठी सहा षटकांत ३३ धावांची गरज आहे.

Web Title: CPL 2021 : Hafeez was out of the crease when dwayne Bravo was going to bowl and then he decided to stop but didint Mankad, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.