Join us  

CPL 2020 : पाकिस्तानी फलंदाजाला 'इंग्रजी' येईना, नेपाळचा गोलंदाज धावला मदतीला, Video 

CPL 2020 : ग्लेन फिलिपच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी फलंदाज आसीफ अलीनं अखेरपर्यंत खिंड लढवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:01 PM

Open in App

कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) आजच्या सामन्यात रोस्टन चेसच्या फटकेबाजीनं क्रिकेट चाहत्यांची वाहवाह मिळवली. सेंट ल्युसीआ झौक्स आणि जमैकन थलाव्हास संघामध्ये आजचा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झौक्स संघानं 7 बाद 158 धावांचे आव्हान आंद्रे रसेलच्या थलाव्हास संघासमोर उभे केले.  त्याला थलाव्हास संघाकडून सडेतोड उत्तर मिळाले. ग्लेन फिलिपच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी फलंदाज आसीफ अलीनं अखेरपर्यंत खिंड लढवली. त्याला कार्लोस ब्रेथवेटनं 200च्या स्ट्राईकरेटनं आतषबाजी करून चांगली साथ दिली. सामनावीर म्हणून आसीफ अलीला गौरविण्यात आले, परंतु त्याला इंग्रजी बोलायला न आल्यानं नेपाळच्या गोलंदाजाची मदत घ्यावी लागली. 

CPL 2020 : झेल पकडण्यासाठी दोन खेळाडू एकमेकांवर आदळले अन् पुढे जे झाले ते पाहाच...

प्रथम फलंदाजी करताना राखहीम कोर्नवॉलनं दोन खणखणीत चौकार मारून सुरुवात केली, परंतु दुसऱ्याच षटकात तो बाद झाला. त्यानंतर आंद्रे फ्लेचर ( 22) आणि मार्क डेयल (17) यांनी थोडं योगदान दिलं. रोस्टन चेस एका बाजूनं खिंड लढवत होता. नजिबुल्लाह झाद्राननं ( 25) त्याला साथ लाभली, परंतु त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. चेसनं एक बाजू लावून धरताना 42 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 52 धावा केल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. 

लक्ष्याचा पाठलाग करताना थलाव्हासचा सलामीवीर चॅडविच वॉल्टन ( 2) आणि निकोलस किर्टन ( 1) लगेच माघारी परतले. ग्लेन फिलिप (44) याने कर्णधार रोवमन पॉवेल ( 26) आणि असीफ अली यांच्यासह संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, केस्रीक विलियमनं फिलिपला बाद केले. आंद्रे रसेलकडून अपेक्षा होत्या, परंतु त्यानं निराश केलं. 17 चेंडूंत 2 चौकार लगावत त्यानं केवळ 16 धावा केल्या. अलीनं एका बाजूनं खिंड लढवताना 27 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 47 धावा केल्या. ब्रेथवेटनं 9 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 18 धावा केल्या. थलाव्हासनं हे आव्हान 18.5 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. 

प्रथमच सीपीएलमध्ये खेळणाऱ्या अलीनं पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. पुरस्कार वितरण सोहळ्यात त्याला इंग्रजी बोलता येत नसल्यानं नेपाळचा गोलंदाज संदीप लामिचाने त्याच्या मदतीला आला.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगपाकिस्ताननेपाळ