Join us  

CPL 2020 : कोरोना लढाईला बळ देतोय 'षटकार'; चेंडू सीमापार जाताच दान होताहेत साडेतीन हजार

CPL 2020 : आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांत 115 षटकारांची आतषबाजी झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 7:06 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएल भारतात नव्हे तर संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबरला आयपीएलची फायनल खेळवण्यात येणार आहे. आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझी यूएईत दाखल झाले आहेत आणि या आठवड्याच्या अखेरीस सरावालाही सुरुवात करतील. आयपीएलपूर्वी कॅरेबियन प्रीमिअर लीगनं ( सीपीएल) क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे. पण, या मनोरंजनातूनीह सीपीएल कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या मोहीमेला आर्थिक मदत करत आहे. सीपीएलमधील प्रत्येक षटकारामागे 50 डॉलरची ( भारतीय चलनात 3,716 रूपये) मदत कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठीच्या मोहीमेला केली जाणार आहे.

18 ऑगस्टपासून या लीगला सुरुवात झाली असून आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांत 115 षटकारांची आतषबाजी झाली आहे. मागील मोसमात 541 षटकारांची आतषबाजी झाली होती. आतापर्यंत 115 षटकारांनुसार 4 लाख 27,393 रुपयांची मदत केली गेली आहे आणि लीगचे 23 सामने शिल्लक आहेत.

सीपीएलचे सीओओ पेट रसेल यांनी सांगितले की,''समाजाचं आपण देणं लागतो, याचं भान सीपीएलनं राखलं आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आम्ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हायरसशी लढण्यासाठी अनेक जणं दिवसरात्र मेहनत घेत आहेत आणि आमच्या या मदतीनं त्यांना थोडासा हातभार लागणार आहे. मागील मोसमापेक्षा अधिक षटकारांचा पाऊस यंदा पडेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.'' सीपीएलमध्ये आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड आणि ख्रिस लीनसारखे बिग हिटर फलंदाज आहेत. सहा संघांमध्ये 33 सामने होणार असून 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

जाणून घ्या वेळापत्रक26 ऑगस्ट - जमैका थलाव्हास वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून26 ऑगस्ट - सेंट ल्युसीआ झौक्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून  27 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून27 ऑगस्ट - सेंट ल्युसीआ झौक्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सांयकाळी 7.30 वाजल्यापासून 28 ऑगस्ट - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून 29 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून30 ऑगस्ट -  सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून 30 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून31 ऑगस्ट - सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून1 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून2 सप्टेंबर - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून2 सप्टेंबर - त्रिनबागो नाइट रायडर्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून3 सप्टेंबर - सेंट ल्युसीआ झौक्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून3 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून4 सप्टेंबर - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून5 सप्टेंबर - त्रिनबागो नाइट रायडर्स वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून6 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून6 सप्टेंबर - सेंट किट्स अँड्स नेव्हीस पॅट्रीओट्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून7 सप्टेंबर - सेंट ल्युसीआ झौक्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासूनउपांत्य फेरी8 सप्टेंबर - सायंकाळी 7.30 वाजता9 सप्टेंबर - मध्यरात्री 3 वाजताअंतिम सामना11 सप्टेबंर - मध्यरात्री 2.30 वाजता  

थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना

जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!  

इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!

जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!

IPL 2020 : युवराज सिंगसाठी घेतला होता डिसिजन; रोहित शर्मा पुन्हा बदलणार 'पोझिशन'!

सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा 

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ठेवला आदर्श; दुबईत जपला 'स्वदेशी' मंत्र! 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगकोरोना वायरस बातम्या