आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूची CPL 2020मध्ये फटकेबाजी; पोलार्डची मिळाली साथ

CPL 2020 : प्रथम फलंदाजीला आलेल्या सिमन्स आणि नरीन यांना पहिल्या विकेटसाठी 32 धावा जोडता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 10:22 PM2020-09-01T22:22:51+5:302020-09-01T22:23:32+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2020 : Colin Munro smash 65 runs for Trinbago Knight Riders, Jamaica Tallawahs need 185 runs to win | आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूची CPL 2020मध्ये फटकेबाजी; पोलार्डची मिळाली साथ

आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूची CPL 2020मध्ये फटकेबाजी; पोलार्डची मिळाली साथ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) आतापर्यंत अपराजित राहिलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं मंगळवारी जमैका थलाव्हास संघाविरुद्ध दमदार खेळ केला. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) लिलावात अनसोल्ड राहिलेल्या कॉलीन मुन्रोनं आज फटकेबाजी करताना नाइट रायडर्सला 4 बाद 184 धावांपर्यंत मजल मारून दिली. लेंडल सिमन्स आणि सुनील नरीन या सलामीवीरांना मोठी खेळी खेळण्यात अपयश आल्यानंतर कॉलीन मुन्रोनं फटकेबाजी केली. कर्णधार किरॉन पोलार्डनंही त्याला साजेशी साथ दिली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या सिमन्स आणि नरीन यांना पहिल्या विकेटसाठी 32 धावा जोडता आल्या. नरीन 11 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 29 धावांत माघारी परतला. त्यानंतर सिमन्स आणि मुन्रो यांनी संघाची धुरा सांभाळली, परंतु संदीप लामिछानेनं ही जोडी फोडली. सिमन्स 25 धावांवर बाद झाला. टीम सेईफर्ट ( 18) लगेच बाद झाला. पण, मुन्रो आणि पोलार्ड यांनी अखेरपर्यंत खिंड लढवली. मुन्रोनं 54 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारांसह 65 धावा केल्या, तर पोलार्डनं 16 चेंडंत 1 चौकार व 3 षटकार खेचताना नाबाद 33 धावा केल्या.

मुन्रोची आयपीएलमधील कामगिरी
मुन्रोनं 2016, 2018 आणि 2019च्या आयपीएलमध्ये सहभाग घेतला. त्यानं कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केलं. 13 सामन्यांत त्याला 14.75 च्या सरासरीनं 117 धावा करता आल्या. 

Web Title: CPL 2020 : Colin Munro smash 65 runs for Trinbago Knight Riders, Jamaica Tallawahs need 185 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.