Join us  

CPL 2019 : 140 किलोच्या कोर्नवॉलची 'वजन'दार कामगिरी; 250च्या स्ट्राईक रेटनं दे दणादण!

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रहकीम कोर्नवॉल त्याच्या कामगिरीपेक्षा 140 किलो वजनामुळे चर्चेत राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 9:42 AM

Open in App

जमैका : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रहकीम कोर्नवॉल त्याच्या कामगिरीपेक्षा 140 किलो वजनामुळे चर्चेत राहिला. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यानं तीन फलंदाजांना बाद केले. यामध्ये चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश होता. याच रहकीमनं कॅरेबीनय प्रीमिअर लीगमध्ये दे दणादण फटकेबाजी केली आहे. या अगडबंब खेळाडूंनं केलेल्या 'वजन'दार कामगिरीच्या जोरावर सेंट ल्युसिया झौक्स संघाने विजय मिळवला.  प्रथम फलंदाजी करताना जमैका थलावाज संघाने 5 बाद 170 धावा केल्या. 5 बाद 137 धावा असताना हा प्रसंग घडला. जमैकाच्या ग्लेन फिलिप्सने 34 चेंडूंत 58 धावा केल्या, तर युनिव्हर्सल बॉल भोपळा न फोडताच माघारी परतला. रोव्हमन पॉवेलने 22 चेंडूत 44 धावांची उपयुक्त खेळी केली. ओबे मॅकोय आणि फवाद अहमद यांनी प्रत्येकी दोन, तर थिसारा परेराने एक विकेट घेतली. सामन्याच्या 14 व्या षटकात झौक्स संघाचा वेगवान गोलंदाज हार्डस विलजोनचा बाऊंसर रसेलच्या डोक्यावर जोरात आदळला. हा चेंडू कानाच्या अगदी जवळ आदळला.  त्यानंतर लगेचच रसेल मैदानावर आडवा झाला. त्याच्या अवतीभवती इतर खेळाडू जमले आणि त्यांनी रसेलचा हॅल्मेट बाजूला केले. त्यानंतर त्वरितच वैद्यकिय पथक दाखल झाले आणि त्यांनी रलेसलला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेले. झौक्स संघाने 16.4 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. आंद्रे फ्लेचर आणि रहकिम कोर्नवॉल यांच्या फटकेबाजीनं संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात फ्लेचर आणि कोर्नवॉल यांनी पहिल्या विकेटसाठी 8.4 षटकांत 111 धावांची भागीदारी केली. शॅमेर  स्पिंजरने नवव्या षटकात कोर्नवॉलला बाद केले, परंतु तोपर्यंत झौक्सचा विजय निश्चित झाला होता. कोर्नवॉलने 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 30 चेंडूंत 250 च्या स्ट्राईक रेटनं 75 धावा चोपल्या. त्यात 4 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. फ्लेचरने 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 47 धावा केल्या.   

टॅग्स :टी-20 क्रिकेटवेस्ट इंडिज