Join us

Shoaib Akhtar : भारताला मदतीची गरज; त्यांच्यासाठी दान करा, त्यांना निधी गोळा करून द्या - शोएब अख्तर

भारतात शनिवारी कोरोनाचे ३ लाख ४६,७८६ नवे रुग्ण सापडले आणि एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मागील २४ तासांत २६२४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 19:18 IST

Open in App

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यानं पाकिस्तानी चाहत्यांना भारताच्या मदतीसाठी पुढे या, असं आवाहन केलं आहे. भारतात शनिवारी कोरोनाचे ३ लाख ४६,७८६ नवे रुग्ण सापडले आणि एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मागील २४ तासांत २६२४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

''कोणत्याही सरकारला या संकटाचा सामना करणं जवळपास अशक्यच आहे. मी माझ्या सरकारला आणि चाहत्यांना आवाहन करतो की भारताला मदत करा. भारताला सध्या ऑक्सिजन टँकची गरज आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी भारताला निधी मिळवून देण्यासाठी दान करा आणि ऑक्सिजन टँक्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा,''असे आवाहन शोएबनं यूट्यूबवरून केलं आहे. 

शोएब अख्तरनं ट्विट केलं की,''भारतातील नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो. परिस्थितीत लवकर सुधारणा होईल, अशी मी अपेक्षा करतो आणि भारत सरकार या संकटाशी मुकाबला करेल. या कठीण काळात आपण सर्व एकत्र आहोत.'' 

टॅग्स :शोएब अख्तरकोरोना वायरस बातम्या