Join us

हेलिकॉप्टरमुळं लाइव्ह क्रिकेट सामना थांबवला; भर मैदानात खेळाडूंसमोर झालं लँडिंग!, पाहा VIDEO

इंग्लंडमध्ये नुकतीच एक अशी घटना घडली की याआधी क्रिकेट विश्वात असं कधीच घडलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:08 IST

Open in App

क्रिकेट विश्वात आजवर भर मैदानात प्रेक्षकांच्या एण्ट्रीमुळं किंवा पावसामुळे सामना थांबवावा लागल्याचं आपण पाहिलं आहे. तर कधी ढगाळ वातावरणामुळंही सामने थांबले आहेत. पण इंग्लंडमध्ये नुकतीच एक अशी घटना घडली की याआधी क्रिकेट विश्वात असं कधीच घडलेलं नाही. एका लाइव्ह क्रिकेट सामन्यात भर मैदानात चक्क हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलं आणि यामुळे सामना थांबवावा लागला होता. 

काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये डरहॅम आणि ग्लॉस्टरशायर यांच्यात सामना सुरू असताना ही घटना घडली आहे. ब्रिस्टलच्या काऊंटी ग्राऊंडवर सामना सुरू होता. सामन्यात पहिल्या षटकाचे केवळ पाच चेंडू टाकले गेले होते आणि इतक्यात एक हेलिकॉप्टर स्टेडियमवर आलं. या हेलिकॉप्टरचं मैदानातच लँडिंग देखील झालं. त्यानंतर सामना जवळपास २० मिनिटं थांबवावा लागला होता. 

मैदानात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंगसामना सुरू असतानाच अचानक एक घोषणा करण्यात आली की एका गंभीर अपघातात जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर मैदानात उतरवण्यात येत आहे. ग्रेट वेस्टर्न एअर अॅम्ब्युलन्स चॅरिटी हेलिकॉप्टर मैदानात उतरवण्यात आलं. यावेळी सर्व खेळाडूंना हेलिकॉप्टरपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

टॅग्स :इंग्लंड
Open in App