Join us  

Corona Virus : आफ्रिदीला पाठिंबा देण्यावरून टीका करणाऱ्यांना हरभजन सिंगनं सुनावलं

ट्विटरवर काल #ShameonYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 1:13 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पाकिस्तानातही लॉकडाऊनमुळे रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कार्य करत आहे. त्यानं तेथील जवळपास 2000 गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या आहेत. पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन समाजालाही त्यानं ही मदत पुरवली आहे. त्याच्या या समाजकार्याला भारताचे क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी पाठिंबा दिला आणि आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहनही केलं. पण, भज्जी आणि युवीचं हे आवाहन नेटिझन्सना आवडलं नाही आणि त्यांनी दोघांवर प्रचंड टीका केली. युवीनंतर आता भज्जीनं टीकाकारांना खडे बोल सुनावले.

हरभजन सिंगनेही ट्विट करून आफ्रिदीला पाठिंबा दिला. त्यानं लिहिलं की,'' शाहिद आफ्रिदी आणि त्याचं फाऊंडेशन चांगलं काम करत आहेत. त्याच्या कार्यात आपणही हातभार लावूया आणि जमेल तशी मदत करूया...' त्यानंतर ट्विटरवर काल #ShameonYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. त्यावर युवीला मी भारतीय आहे, असं म्हणण्याची वेळ आली. त्यानं ट्विट केलं की,''माझ्या एका मॅसेजवर एवढा हल्लाबोल करण्यासारखं काय होतं, हे मला समजलं नाही. तरीही कोणालाही दुखवायचा माझा हेतू नव्हता. मी भारतीय आहे आणि नेहमी मानवतेसाठी उभा राहीन. जय हिंद.''

युवीच्या ट्विटनंतर भज्जीनंही टीकाकारांना सुनावलं. त्यानं एक व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं की,''कोणता धर्म नाही किंवा जात नाही, फक्त मानवता.. घरात सुरक्षित राहा. प्रेम पसरवा, तिरस्कार व व्हायरस नको. प्रत्येकासाठी प्रार्थना करूया.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

World Cup 2011च्या विजयाचं श्रेय MS Dhoni ला दिलं म्हणून भडकला गौतम गंभीर , म्हणाला...

World Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम

तुम्ही देशासाठी काय केलंत? गौतम गंभीरनं विचारला सवाल; दोन वर्षांचा पगार केला दान

Video : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम

जसप्रीत बुमराह करतो स्वयंपाक अन् भांडी घासण्याचं काम  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहरभजन सिंगयुवराज सिंगशाहिद अफ्रिदी