नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीदरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीने जीवनाचा धोका पत्करत आपल्या कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांची प्रशंसा करताना टिष्ट्वटरवर आपल्या डीपीमध्ये महाराष्ट्र पोलीसचे प्रतीक चिन्ह लावले.
कोहलीने अडचणीच्या वेळी नागरिकांची मदत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसची प्रशंसा केली आणि लोकांना सोशल मीडियामध्ये आपल्या डीपीमध्ये पोलिसचे प्रतीक चिन्ह लावण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक फटकाविणाºया या खेळाडूने टिष्ट्वट केले, ‘महाराष्ट्र पोलीस कुठल्याही आपत्तीत, हल्ला व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांसोबत असतात.
आज ते रस्त्यावर कोरोना व्हायरसविरुद्ध युद्धाचे नेतृत्व करीत असल्यामुळे मी टिष्ट्वटरवर महाराष्ट्र पोलीसचे प्रतीक चिन्हाला आपल्या डीपीमध्ये स्थान देत त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नात तुम्ही मला साथ द्या.’ भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.(वृत्तसंस्था)