नवी दिल्ली: कोरोनाविरुद्धच्या लढाईत योद्ध्याची भूमिका बजावत असलेला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर हा शुक्रवारी ४७ वर्षांचा होत आहे. तथापि यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा त्याने निर्णय घेतला. ‘ही आनंद साजरा करण्याची वेळ नाही. कोरोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर नर्सेस, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सैनिकांप्रति आदर व्यक्त करण्याची वेळ असल्याचे,’सचिनच्या निकटवर्तीयांचे मत आहे. सचिनने कोरोनाविरुद्ध लढासाठी ५० लाख रुपये दान दिले आहेत.