Join us

Coronavirus: गरजूूंच्या मदतीसाठी कपिल देव, सुनील गावस्कर अनं गौतम गंभीर मैदानात

गावस्कर, कपिल आणि गंभीर हे आर्थिक योगदान देत असून याच आठवड्यात मोहम्मद अझहरुद्दीन यानेदेखील आर्थिक मदतीचे आश्वासन दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 00:20 IST

Open in App

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या स्थितीत अडकलेल्या ३० गरजू क्रिकेटपटूंच्या आर्थिक मदतीसाठी अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत. भारतीय क्रिकेटर्स संघटनेने(आयसीए)आतापर्यंत ३९ लाख रुपये उभारले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी दिली.

सुनील गावस्कर, कपिल देव, गुंडप्पा विश्वनाथ आणि गौतम गंभीर यांच्यासारखे खेळाडू आमच्या मोहिमेत उतरले असून यामुळे निधी उभारण्यास मदत होईल शिवाय खेळाडूंचे मनोबल वाढणार आहे. गुजरातमधील कॉर्पोरेट कंपनीचा मोहिमेला पाठिंबा मिळाल्याचे विश्वनाथ यांनी सांगितले.

गावस्कर, कपिल आणि गंभीर हे आर्थिक योगदान देत असून याच आठवड्यात मोहम्मद अझहरुद्दीन यानेदेखील आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. आयसीए १५ मेपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार असून, त्यानंतर देशातील प्रत्येक क्षेत्रातील पाच ते सहा गरजू खेळाडूंचा शोध घेत त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या