Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला देणार स्वत:चा वेगळा चेंडू

ईसीबीचे क्रिकेट संचालक अ‍ॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 04:52 IST

Open in App

लंडन : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी म्हणून इंग्लंड क्रिकेट संघाचा पुढील आठवड्यापासून सराव सुरू होणार आहे. सरावासाठी प्रत्येक खेळाडूला चेंडूचा वेगळा बॉक्स दिला जाईल, मात्र चेंडूवर ते लाळ लावू शकणार नाहीत. कोरोनामुळे ईसीबीने १ जुलैपर्यंत क्रिकेट स्थगित केले आहे. दरम्यान, उन्हाळ्यात क्रिकेट सुरू करण्याच्या हेतूने ३० खेळाडूंना सरावाची संधी बहाल केली.ईसीबीचे क्रिकेट संचालक अ‍ॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील. ‘एक खेळाडू एक चेंडू’ हे सूत्र प्रत्येकासाठी लागू असेल. चार किंवा पाच गोलंदाजांसाठी एकच कोच देण्यात येणार आहे. सरावादरम्यान शारीरिक अंतराचे भान राखून कुठलीही वस्तू खेळाडू एकमेकांमध्ये शेअर करणार नाहीत. खेळाडू केवळ स्वत:च्या बॉक्समधील चेंडूचा वापर करू शकतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटइंग्लंड