मेलबोर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा मुकाबला करण्यासाठी खर्च कपातीचे उपाय जाहीर केले. त्यानुसार वरिष्ठ व्यवस्थापनाच्या बोनसमध्ये कपात करण्यात आली असून, ४० कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ दिला आहे. याशिवाय ‘अ’ संघांच्या सर्व आंतरराष्ट्रीय दौºयांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी सीईओपदाचा राजीनामा देणारे केविन रॉबर्टस् यांच्याऐवजी अंतरिम पद सांभाळणारे निक हॉकले हे नव्या योजनेसह कामाला लागले असून, त्यांनी दीर्घकालीन स्थिरता आणि विकासाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाने बुधवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘कर्मचाºयांपुढे सादर करण्यात आलेल्या २०२१ च्या आर्थिक योजनेनुसार जवळपास साडेचार कोटी डॉलरच्या कपातीचा शोध घेण्यात आला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. क्रिकेटसाठी कठीण असलेल्या या काळात ४० कर्मचाºयांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे.’ एप्रिलमध्ये रॉबर्टस् यांच्या नेतृत्वात सीएने ८० टक्के स्टाफला सरकारी खर्चाचे कवच मिळवून दिले होते. क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्ज यांनी कर्मचाºयांसाठी हा काळ कठीण असून, कोरोना लॉकडाऊनच्या काळात क्रिकेटमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. २०२१ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या अ संघांचे आंतरराष्टÑीय दौरे रोखण्यात येणार असून, आॅस्ट्रेलिया एकादश संघांचे कार्यक्रम, फॉक्स क्रिकेट, राष्टÑीय प्रीमियर टी-२० तसेच टोयोटा सेकंड डिव्हिजनवर बंदीचा निर्णय घेतला .