जोगिंदर शर्मा ते सचिन तेंडुलकर सर्व क्रिकेटपटू कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीला धावले आहेत. सर्वांना आपापल्या परीनं आर्थिक मदत केली आहे. भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा आणि भारतीय महिला वन डे संघाची कर्णधार मिताली राज लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
अमित मिश्रानं दिल्ली पोलिसांच्या मदतीनं गरजूंना अन्नाचं वाटप केलं आहे. ''अनेक जणं बिकट अवस्थेत आहेत आणि त्यांना चांगलं अन्नही मिळत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्याची मला संधी मिळाले, हे मी भाग्य समजतो,'' असे अमित मिश्रानं ट्विट केलं आहे.
भारताचा गोलंदाज शेल्डन जॅक्सनही रस्त्यावरील कुत्र्यांना जेवण देत आहेत.
मिताली राजनेही काही दिवसांपूर्वी गरजूंना अन्न वाटप केले.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी 59 लाखांचे दान केले आहे. त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत 35 लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 24 लाख दिले आहेत. त्यांनी दान केलेल्या रकमेमागे एक गुपित आहे. गावस्कर यांनी टीम इंडियाक़डून 34 कसोट आणि 1 वन डे शतक झळकावलं आहे. म्हणून त्यांनी केंद्राला 35 लाखांची मदत केली. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 22 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2 शतकं अशी 24 शतकं झळकावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला 24 लाखांची मदत केली.
रोहित शर्मानं 80 लाखांची मदत केली. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक!
भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...
युवराज, हरभजनच्या मदतीला 'रावळपिंडी एक्स्प्रेस'; टीकाकारांवर हल्लाबोल
भारतीय खेळाडूंच्या 'जर्सी क्रमांका'मागची मजेशीर गोष्ट...
Corona Virus : ... तर भारताचे हे उपकार पाकिस्तान कधीच विसरणार नाही, शोएब अख्तर