Join us  

Corona Virus : रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी

या व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका हा आर्थिक दुर्लब घटकाला बसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 12:50 PM

Open in App

कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस धरले आहे. जगभरात आतापर्यंत 8 लाख 59, 947 कोरोना रुग्ण आढळले असून मृतांची संख्या 42, 344 च्या घरात गेली आहे. या व्हायरसपासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 1 लाख 78,364 इतका आहे. या व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका हा आर्थिक दुर्लब घटकाला बसत आहे. त्यामुळे गरिबांसाठी अनेक सेलिब्रेटी समोर येत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीनं गरिबांना मदत करत आहे. पण, एक क्रिकेटपटू रस्त्यावर उतरून गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहे. शिवाय त्यानं 200 गरीब कुटुंबीयांची जबाबादीरीही घेतली आहे.

बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू मोसाडेक होसैननं समाजातील दुर्लब घटकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम केलं आहे आणि त्याने या संकट काळात 200 कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे. मायमेनसिंग येथील गरिबांना त्यानं स्वतः जावनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. या भागात रोजंदारी कामगार अधिक संख्येत आहे. होसैननं इतरांनाही पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. ''या संकटसमयी गरिबांना मदत करण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा. मी माझ्यापरीनं मदत करत आहे,'' असं होसैन म्हणाला.

24 वर्षीय खेळाडूनं फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यानं बांगलादेशमध्ये 6 कोटी गरीब असल्याचं नमूद केले आहे. तो म्हणाला,'' कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला हतबल केलं आहे. बांगलादेशात 6 कोटी लोकं गरीब आणि बेघर आहेत. त्यांच्या मदतीसाठी मी पुढाकार घेतला आहे. संकट काळात त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. समाजासाठी तुम्हीही हातभार लावा.'' याआधी, बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी त्यांचा निम्मा पगार कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी बांगलादेश सरकारला दिला. बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफे मोर्ताझानेही गरिबांना धान्य पुरवण्याची जबाबादारी घेतली आहे. अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनही मदत करत आहे.  

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत

 तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स 

मजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत

 सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय... 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याबांगलादेश