शनिवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा २ धावांनी पराभव केला. चेन्नईचा सलामीवीर आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर परस्थिती बदलली. विजयाचा उंबरठा गाठूनही चेन्नईच्या पदरात निराशा पडली. म्हात्रेनंतर फलंदाजीसाठी आलेल्या डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटमुळे सोशल मीडियावर आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये अनोखा सामना रंगला आहे. डेवॉल्ड ब्रेव्हिस प्रत्यक्षात नॉट आऊट होता. परंतु, त्याने रिव्ह्यू घ्यायला वेळ लावल्याने पंचांनी त्याला बाद घोषित केले.
चेन्नईच्या डावातील १७व्या षटकातील तिसरा चेंडू ब्रेव्हिसच्या पॅडला लागला. आरसीबीच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर पंचांनी त्याला बाद घोषित केले. थोड्या वेळानंतर ब्रेव्हिसने डीआरएससाठी इशारा केला. परंतु, पंचांनी वेळचे कारण देत डीआरएस नाकारला. यादरम्यान एक तांत्रिक चूक झाली. ब्रेव्हिस बाद झाल्यानंतर स्क्रीनवर टायमर दाखवण्यात आला नाही, ज्यामुळे फलंदाज गोंधळात पडला आणि डीआरएस घेण्यासाठी त्याला उशीर झाला.
दरम्यान, सीएसकेचे चाहते पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दुसरीकडे आरसीबीचे चाहते त्यावर उत्तर देण्यासाठी पुढे येत आहेत. आरसीबीचे चाहते एक व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यात ब्रेव्हिस बाद झाल्यानंतर सुमारे २५ सेकंदांनी डीआरएसची मागणी करत आहे. सामन्यादरम्यानसमालोचक असेही म्हणत होते की, स्क्रीनवर टायमर दाखवला गेला नाही तर, फलंदाज वेळेचा अंदाज कसा लावेल. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने या वादावर ट्विट केले आणि लिहिले की, 'टाइमर असो किंवा नसो, पण डेवाल्ड ब्रेव्हिसविरुद्ध हा खूप खराब निर्णय होता.'
Web Title: Controversy over Dewold Brevis' wicket, RCB-CSK fans clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.