Join us
Daily Top 2Weekly Top 5

शामीचा करार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नाही तर ' यांनी' केला रद्द

शामीचे वैयक्तिक आयुष्य आणि खेळ यांचा काही संबंध नाही, असे बीसीसीआयने म्हटले होते. पण तरीही त्याचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 14:27 IST

Open in App
ठळक मुद्देबीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाने याप्रकरणी त्याची तीन तास चौकशी केली आहे.

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने मॅच फिक्सींगचाही आरोप केला होता. यानंतर बीसीसीआयने शामीचा करार रद्द केला होता. पण हा करार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी रद्द केलेला नाही, ही बाबा आता समोर आली आहे.

खेळाडूचे बाबतचे सर्व अधिकार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे होते. पण काही दिवसांमध्ये बीसीसीआयमध्ये काही बदल झाले आहेत. बीसीसीआयचे प्रभारी अधिकारी आता फक्त नावापुरते राहीलेले आहेत. कारण या अधिकाऱ्यांकडे कोणतेही अधिकार राहीलेले नाहीत.

हसीने जेव्हा शामीवर मॅच फिक्सींगचे आरोप केले होते तेव्हा त्याने हे आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले होते. भारताचा माजी कर्णधार महेंदसिंग धोनीनेही शामी हा कधीच मॅच फिक्सींग करू शकत नाही, असे म्हटले होते. शामीनेही मी देशाची फसवणूक कधीच करू शकत नाही, असे वक्तव्य केले होते. पण बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाने याप्रकरणी त्याची तीन तास चौकशी केली आहे.

आता बीसीसीआयमध्ये सर्व अधिकार प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शामीचे वैयक्तिक आयुष्य आणि खेळ यांचा काही संबंध नाही, असे बीसीसीआयने म्हटले होते. पण तरीही त्याचा करार रद्द करण्याचा निर्णय राय यांनीच घेतला आहे. त्यापुढे बीसीसीआयमध्ये राय यांचीच सत्ता राहणार का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

टीम इंडिया के तेज गेंदबाज मोहम्मद शमी पर जब से पत्नी के साथ घरेलू हिंसा और दूसरी महिलाओं के साथ नाजायज संबंधों के आरोप लगे हैं, तब से उनकी सेंट्रर कॉन्ट्रैक्ट को लेकर भी मुश्किलें बढ़ रही हैं। पत्नी के साथ विवादों में घिरने के बाद बीसीसीआई ने उनका सेंट्रल कॉन्ट्रैक्ट रोक दिया है। अब खबर यह सामने आ रही है कि बोर्ड के इस निर्णय को सर्वसम्मति से नहीं लिया गया, बल्कि शमी का कॉन्ट्रैक्ट रोकने का यह निर्णय सिर्फ और सिर्फ प्रशासनिक कमिटी (CoA) के अध्यक्ष विनोद राय का था।

टॅग्स :मोहम्मद शामीबीसीसीआय