Join us  

भारताचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध तक्रार, दोन लाभाच्या पदावर कार्यरत असल्याचा आरोप

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्ध मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे अजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी हित जोपासण्याच्या मुद्यावर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:50 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्ध मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे अजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी हित जोपासण्याच्या मुद्यावर तक्रार केली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी.के. जैन यांनी रविवारी सांगितले.गुप्ता यांनी यापूर्वीही अन्य खेळाडूंविरुद्धही अशा प्रकारचे आरोप केले होता. त्यानंतर हे आरोप फेटाळण्यात आले. जैन म्हणाले,’ मला तक्रार मिळाली आहे.मी त्याची चौकशी करणार असून त्यात काही तथ्य आहे का, हे तपासून पाहील. तथ्य असेल तर कोहलीला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल.’गुप्ता यांनी दावा केला आहे की, कोहली कॉर्नरस्टोन व्हेंचर पार्टनर्स एलएलपी आणि विराट कोहली एलएलपीमध्ये संचालक आहे. या कंपनीत अरुण सजदेह (बंटी सजदेह) आणि बिनॉय भरत खिमजी हे सुद्धा सह-संचालक आहेत. हे   दोघेही कॉर्नरस्टोन स्पोर्ट््स अ‍ॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लिमिटेडचा भाग आहेत. कॉर्नरस्टोन स्पोर्ट््स अ‍ॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लिमिटेडमध्ये कोहलीची भूमिका नाही. ही कंपनी भारतीय कर्णधाराव्यतिरिक्त एल. राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, उमेश यादव व कुलदीप यादवसह अन्य खेळाडूंच्या व्यावसायिक हितांचे व्यवस्थापन करते.गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ‘ वर निर्देशित कंपनीमध्ये विराट कोहली पदावर असणे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातर्फे अनुमोदित बीसीसीआय नियम ३८ (४) चे उल्लंघन आहे. नियमाचे पालन करताना कोहलीला एका पदाचा त्याग करावा लागेल.‘ गेल्या महिन्यात जैन यांचा कार्यकाळ वर्षभरासाठी वाढविण्यात आल्यानंतर हे पहिलेच मोठे प्रकरण आहे.अपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान जैन यांनी भारतीय क्रिकेटचे महान फलंदाज राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कपिल देव यांच्याविरुद्धच्या तक्रारींची शहनिशा केली होती. या सर्व तक्रारी गुप्ता यांनी केल्या होत्या. त्यानंतर या दिग्गज खेळाडूंना एका पदावरुन राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ही सर्व प्रकरणे निकाली निघाली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीही म्हटले आहे की, लोढा समितीतर्फेनिर्धारित करण्यात आलेला हित जोपासण्याचा मुद्दा तात्त्विकदृष्ट्या योग्य नाही. (वृत्तसंस्था)गुप्ता यांनी आपल्या नव्या तक्रारीमध्ये आरोप केला  आहे की, कोहली एकाचवेळी दोन पदावर काम करीत आहे. तो भारतीय संघाचा कर्णधार असून अनेक खेळाडूंचे काम बघणाऱ्या एका प्रतिभा प्रबंधन कंपनीमध्ये सह-संचालक आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार एका व्यक्तीला अनेक पदावर राहता येत नाही. हे घटनेचे उल्लंघन आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय