Join us

प्रतिभावान युवा खेळाडू वाढल्याने संघात स्पर्धा : धवन

पृथ्वी शॉ आणि शुभमान गिलसारखे युवा प्रतिभावान खेळाडू दाखल झाल्याने भारतीय संघात स्पर्धा निर्माण झाल्याचे सलामीवीर शिखर धवन याने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:59 IST

Open in App

माऊंट माऊंगानुई : पृथ्वी शॉ आणि शुभमान गिलसारखे युवा प्रतिभावान खेळाडू दाखल झाल्याने भारतीय संघात स्पर्धा निर्माण झाल्याचे सलामीवीर शिखर धवन याने म्हटले आहे.शॉने आॅक्टोबर महिन्यात कसोटी संघात पदार्पण केले तर गिल याला न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वन डे मालिकेसाठी संघात स्थान मिळाले. दोघांनीही वर्षभराआधी न्यूझीलंडमध्येच झालेल्या अंडर १९ विश्वचषक जेतेपदात मोलाची भूमिका वठविली होती.न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्याआधी धवन म्हणाला, ‘माझ्यामते युवा खेळाडू वेगाने परिपक्व होत आहेत. यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्मिती झाली. स्थान टिकविण्यासाठी प्रत्येकाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल. पृथ्वी शॉ याने संघात येताच शतकी खेळी केली. पहिल्या १५ खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा आहेच शिवाय राखीव फळी देखील बलाढ्य बनली आहे.’ धवनने पहिल्या सामन्यात नाबाद ७५ धावा ठोकून पाच हजार धावांचा टप्पा गाठला होता.

टॅग्स :शिखर धवन