Join us

...त्या तुलनेत विंडीजचा सध्याचा टी-२० संघ सरस - ड्वेन ब्राव्हो

श्रीलंकेत मागच्या दौऱ्याच्या वेळी संघाची बैठक झाली. कोच फिल सिमन्स यांनी फलंदाजी क्रम ठरविला तेव्हा माझे नाव नवव्या स्थानावर होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 01:13 IST

Open in App

नवी दिल्ली : अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो हा वेस्ट इंडिजच्या सध्याच्या टी-२० संघातील फलंदाजीबाबत प्रभावित आहे. हा संघ कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवू शकतो, असे सांगून २०१६ च्या विश्वविजेत्या संघाहूनदेखील सरस असल्याचे म्हटले आहे.

‘ईएसपीएनक्रिकइन्फो’शी बोलताना ब्राव्हो म्हणाला, ‘श्रीलंकेत मागच्या दौऱ्याच्या वेळी संघाची बैठक झाली. कोच फिल सिमन्स यांनी फलंदाजी क्रम ठरविला तेव्हा माझे नाव नवव्या स्थानावर होते. त्याावेळी मी सहकाऱ्यांना म्हणालो, ‘हे बघा माझे नाव नवव्या स्थानी आहे, अशा टी-२० विंडीज संघात मी कधीही राहिलो नव्हतो. मी फलंदाजी क्रमाबाबत फारच प्रभावित होतो. खरे तर विश्वचषक विजेत्या संघापेक्षा सध्याचा संघ अधिक भक्कम असून, दहाव्या स्थानापर्यंत फलंदाज आहेत.’

जेतेपदाचा बचाव करण्याच्या प्रयत्नात मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० तून निवृत्ती मागे घेणारा ब्राव्हो म्हणाला, ‘सध्याच्या संघातील फलंदाजांनी माझी भूमिका तज्ज्ञ गोलंदाजापर्यंत मर्यादित केली आहे.’ आमचा संघ प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारा आहे, ही बाब मला रोमांचित करते. गोलंदाज म्हणून स्वत:चे काम चोखपणे पार पाडेन, शिवाय डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्याचे काम करणार आहे. कर्णधार या नात्याने कीरेन पोलार्डने स्वत:ची भूमिका चोखपणे बजावली. कर्णधार या नात्याने पोलार्डमध्ये विजयाची भूक असणे हे संघाच्या निर्धाराचे प्रतीक ठरते, असे ब्राव्होने सांगितले.

 

टॅग्स :ड्वेन ब्राव्हो