Comilla Victorians vs Fortune Barishal यांच्यात सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमिअर लीगच्या ( BPL) अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरीन ( Sunil Narine) याने तुफान फटकेबाजी केली. कोमिला व्हिक्टोरियन्स ( Comilla Victorians) संघाकडून खेळताना नरीनने २३ चेंडूंत ५७ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत ५ चौकार व ५ षटकार होते, म्हणजेच त्यानं केवळ १० चेंडूंत ५० धावांचा पाऊस पाडला. व्हिक्टोरियन्सन संघाने ५.२ षटकांत २ बाद ६९ धावा केल्या होत्या आणि त्यापैकी ५७ धावा या नरीनच्या होत्या. कोलकाता नाइट रायडर्सने त्याला ६ कोटींत रिटेन केले आहे.
याआधी चत्तोग्राम चॅलेंजर्स ( Chattogram Challengers) संघाविरुद्ध कोमिला व्हिक्टोरियन्स ( Comilla Victorians) संघाकडून खेळताना विंडीजच्या या अष्टपैलू खेळाडूने १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकार खेचून ५७ धावा कुटल्या. त्याने पहिल्या ८ चेंडूंत 6,4,4,6,6,4,6,0 अशी फटकेबाजी करताना ३६ धावा चोपल्या. त्यानंतर त्यानं १३ चेंडूंत BPLमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्यानं १६ चेंडूंत ३५६.२५ च्या स्ट्राईक रेटने ५७ धावांची वादळी खेळी केली आणि त्यात ५ चौकार व ६ षटकारांचा समावेश आहे.