Join us

Rohit Sharma Yuzvendra Chahal Comedy Video India vs West Indies 1st T20 : "दात दाखवत बसू नको.. चल बॉलिंग कर"; रोहित-चहलचा धमाल व्हिडीओ पाहिलात का?

वेस्ट इंडिजच्या डावात १५व्या षटकात घडला हा मजेशीर प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:47 IST

Open in App

Rohit Sharma Yuzvendra Chahal, IND vs WI 1st T20 : भारतीय संघाने धडाकेबाज वेस्ट इंडिजला पहिल्या टी२० सामन्यात ६ गडी राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजच्या संघाकडून निकोलस पूरनने दमदार अर्धशतक ठोकलं होतं. त्याच जोरावर त्यांनी १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. पण भारतीय फलंदाजांच्या प्रयत्नांपुढे हे आव्हान तोकडे पडले. टीम इंडियाने ७ चेंडू राखून वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने दमदार ४० धावा केल्या. तर सूर्यकुमारने नाबाद ३४ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यादरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला.

युझवेंद्र चहल वेस्ट इंडिजच्या डावातील १५वे षटक टाकत होता. पहिल्याच चेंडूवर चहलने पोलार्डला त्याच्या फिरकीने थोडंसं गंडवलं. पण तरीही पोलार्डने कशी बशी धाव घेत एक धाव घेतली. त्यानंतर युझवेंद्र चहल हसायला लागला. चहलला हसताना बघताच स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा चहलला म्हणाला, "दात दाखवत बसू नकोस... लवकर जा आणि बॉलिंग कर". स्टंप माइकवर रोहितची हा मजेशीर डायलॉग साऱ्यांनीच ऐकला. त्यानंतर हा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने सात गडी गमावून १५७ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकांत ४ बाद १६२ धावा करून सामना जिंकला. रोहितने १९ चेंडूत ४० धावा केल्या. इशान किशन ३५ धावाच करू शकला. शेवटच्या टप्प्यात सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. सूर्यकुमार ३४ आणि व्यंकटेश अय्यर २४ धावांवर नाबाद राहिले.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मायुजवेंद्र चहलकिरॉन पोलार्ड
Open in App