Join us  

युवा-अनुभवी खेळाडूंचे संयोजन टीम इंडियासाठी ठरेल लाभदायी - कपिलदेव

‘युवा आणि अनुभवी खेळाडूंचे संयोजन; तसेच विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या जोरावर भारत तिसऱ्यांदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे,’ असे मत माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:35 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘युवा आणि अनुभवी खेळाडूंचे संयोजन; तसेच विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या जोरावर भारत तिसऱ्यांदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे,’ असे मत माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले आहे.विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होईल. १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिलदेव म्हणाले, ‘भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहोचेल, असे माझे मत आहे. भारत सर्वोत्तम चार संघांपैकी एक असेल यात वाद नाही. तथापि, कोणता संघ बाजी मारेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. भारतीय गोलंदाज इंग्लंडमधील परिस्थितीत चांगली कामगिरी करतील, याची खात्री आहे. चारही वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यास मदत मिळेल. याशिवाय शमी आणि बुमराह हे ताशी १४५ किमी वेगाने मारा करण्यात सक्षम आहेत.’ (वृत्तसंस्था)भारत किमान उपांत्य फेरी गाठू शकतो. त्यानंतरचा मार्ग मात्र अधिक कठीण असेल. उपांत्य फेरीनंतर भाग्याची साथ आणि वैयक्तिक कामगिरी या बळावर संघ वाटचाल करू शकेल. भारतासह आॅस्ट्रेलिया, इंग्लंड हे संघही उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतील. याव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि विंडीजचा संघ या स्पर्धेत सरप्राईज फॅक्टर ठरू शकतो. - कपिलदेव‘हार्दिकची माझ्याशी तुलना नको...’हार्दिक पांड्या याची नेहमी कपिल यांच्याशी तुलना केली जाते. यासंदर्भात विचारताच कपिल म्हणाले,‘ हार्दिकवर कुणीही दडपण आणू नये. तो फारच प्रतिभावान खेळाडू आहे, त्याने स्वत:चा नैसर्गिक खेळ खेळावा. माझी कुणाशी तुलना व्हावी हे मला तरी पसंत नाही. अशा गोष्टींमुळे खेळाडूंवर दडपण येते. त्यांचा खेळ खराब होण्याची भिती असते.’

टॅग्स :कपिल देवहार्दिक पांड्यावर्ल्ड कप २०१९