भारतीय संघाच्या कामगिरीचे होणार पोस्टमार्टम, कारवाईचे संकेत... 

भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यावरील कामगिरी हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 15:40 IST2018-09-09T15:40:04+5:302018-09-09T15:40:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
coa would review team india poor performance in england says vinod rai | भारतीय संघाच्या कामगिरीचे होणार पोस्टमार्टम, कारवाईचे संकेत... 

भारतीय संघाच्या कामगिरीचे होणार पोस्टमार्टम, कारवाईचे संकेत... 

नवी दिल्ली - भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यावरील कामगिरी हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील निराशाजनक कामगिरीचे उत्तर भारतीय संघाला द्यावे लागणार असून संघातील खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिले आहेत.  

''संघ व्यवस्थापनाकडून मालिकेतील कामगिरीचा आढावा मागवला जाईल. याबाबत मी कोणतेही आश्वासन देत नाही, परंतु संघाच्या कामगिरीचे परीक्षण केले जाईल. संघ व्यवस्थापनाच्या अहवालानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ,"असे राय यांनी स्पष्ट केले. 



गोलंदाज वगळले तर भारतीय खेळाडूंना या मालिकेत सपशेल अपयश आले आहे. यात संघ व्यवस्थापनाची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरील नाराजी अधिक वाढली आहे. अंतिम अकरा खेळाडू निवडण्याच्या त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे. त्यामुळे प्रशासकीय समितीने दिलेला इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. 

Web Title: coa would review team india poor performance in england says vinod rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.