Join us

Video : खणखणीत षटकार खेचणे पडले महागात, डोक्याला हात लावून मैदानावर बसण्याची वेळ

आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचा म्हण तुम्ही ऐकलीच असेल. असेच काहीसे क्लब क्रिकेटपटूनं केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:21 IST

Open in App

आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचा म्हण तुम्ही ऐकलीच असेल. असेच काहीसे क्लब क्रिकेटपटूनं केलं. आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न होता, परंतु त्यात त्यानं स्वतःचं नुकसान करून घेतले. त्यामुळे त्याचा खिसा रिकामी झाला. त्यानं मारलेल्या उत्तुंग षटकारामुळे हे सर्व घडले. 

हॅलिफॅक्स क्रिकेट लीगमधील (Halifax Cricket League) हा प्रसंग आहे. इलिंगवर्थ सेंट मॅरी क्रिकेट क्लबकडून सीव्हेल व अली हे दोन फलंदाज खेळपट्टीवर होते. सीव्हेलनं अर्धशतक पूर्ण केलं होतं, तर अली धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात लागला होता.   अलीनं १७ चेंडूंत १९ धावा केल्या होत्या आणि त्यानं एक खणखणीत षटकार खेचला. हा षटकार एवढा लांब गेला की मैदानाबाहेरील पार्किंगमध्ये पोहोचला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीच्या मागच्या काचेवर चेंडू पडला अन् गाडीचे नुकसान झाले. आता ही गाडी त्या फलंदाजाचीच होती.  

टॅग्स :इंग्लंडसोशल व्हायरल