Join us

दहावीच्या परीक्षेत विराट कोहलीवर दहा गुणांचा प्रश्न

दहावीच्या परीक्षामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीवर प्रश्न विचारण्यात आला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 09:57 IST

Open in App

कोलकाता - सध्या सर्वत्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. कोलकातामध्ये दहावीच्या परीक्षामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीवर प्रश्न विचारण्यात आला आहे. क्रिकेटमध्ये सध्या तुफान कामगिरी करत सामन्यागणिक नवनवे विक्रम करणाऱ्या कोहलीवर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दहा गुणांचा प्रश्न विचारण्यात आला आहे. 

 

2017 मध्ये 29 वर्षीय विराट कोहलीने आयसीसीचा मानाचा क्रिकेटर ऑफ द ईयर हा खिताब पटकावला होता. कसोटीमध्ये 21 आणि वन-डेमध्ये 35 शतकेही कोहलीच्या नावावर आहेत. सध्या श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 मालिकेतून त्यानं माघार घेतली असली तरीही तो चर्चेत आहे. 

कोलकातामध्ये सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. मंगळवारी बोर्ड परीक्षेमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळं अने पाल्याने भुवया उंचावल्या आहेत. हिंदूस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार,  मंगळवारी झालेल्या इंग्रजीच्या पेपरमध्ये विराट कोहलीवर निबंध लिहायला सांगितले. या प्रश्नासाठी  दहा गुण देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार विद्यार्थांना 'राष्ट्रीय आइकॉन'बद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते आनंदी होते. 

मुर्शीदाबाद येथील नबीपुर सरलाबाला हायस्कूलमधील शमीम अख्तर सांगतो,  मला माझ्या आवडत्या खेळाडूबद्दल लिहताना आनंद झाला. ज्या खेळाडू किंवा व्यक्तीला आपण आपला आदर्श मानतो त्याबद्दल उत्तर लिहताना एक वेगळीच मजा असते. आम्हाला असा प्रश्न विचारला जाईल याची कल्पना नव्हती असेही तो म्हणाला. 

 

टॅग्स :विराट कोहलीपरीक्षा