मुंबई : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल एका जाहिरातीच्या शूटसाठी मुंबईत आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा गेल मैदानाबाहेरील कृत्यांसाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. बुधवारी अशाच एका कृत्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला. मुंबईतील एका पबमध्ये गेल मोठ्या आवाजात गाणी ऐकत डान्स करत होता. त्याच्या या पार्टिमुळे शेजारील लोकांना प्रचंड त्रास झाला आणि त्यांनी 100 नंबरवर कॉल करून मुंबई पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत गेलला बारमधून जाण्यास सांगितले आणि बार मालकावर दंडात्मक कारवाई केली.
पोलिसांनी गेलला हॉटेलमध्ये सोडले. दरम्यान, गेलने पोलिसांच्या बाईकवर बसून फोटो काढले आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केले. गेलच्या या कृतीवर टीका झाली. गेलने दुसऱ्या दिवशी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माफी मागितली.
View this post on Instagram