CPL 2021 : ख्रिस गेलची फक्त २० मिनिटांची खेळी अन् स्टेडियमवरील काचेची काय अवस्था झाली; Video

कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२१च्या पहिल्याच सामन्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा (Chris Gayle)  जलवा पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:48 PM2021-08-27T18:48:37+5:302021-08-27T18:49:03+5:30

whatsapp join usJoin us
Chris Gayle Smashes Window With Brilliant Straight Hit In CPL 2021, Watch Video | CPL 2021 : ख्रिस गेलची फक्त २० मिनिटांची खेळी अन् स्टेडियमवरील काचेची काय अवस्था झाली; Video

CPL 2021 : ख्रिस गेलची फक्त २० मिनिटांची खेळी अन् स्टेडियमवरील काचेची काय अवस्था झाली; Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२१च्या पहिल्याच सामन्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा (Chris Gayle)  जलवा पाहायला मिळाला. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाचे प्रतिनिधित्व करताना गेल खेळपट्टीवर फक्त २० मिनिटच खेळला, परंतु त्या खेळीत त्यानं स्टेडियमची काच फोडली. त्यानं असा खणखणीत षटकार खेचला की साइड स्क्रीनवरील गॅलरीची काचेची खिडकी तुटली. बार्बाडोस रॉयल्स संघाविरुद्धचा हा सामना पॅट्रीओट्सनं २१ धावांनी जिंकला. ( Chris Gayle Smashes Window With Brilliant Straight Hit In CPL 2021)

आरारा sss खतरनाक; इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोनं घेतला अफलातून कॅच, Video  

प्रथम फलंदाजी करताना पॅट्रीओट्सचे सलामीवीर एव्हीन लुईस ( ६) आणि डेव्हॉन थॉमस ( ७) यांना साजेशी सुरुवात करून देता आली नाही. आसीफ अली ( ८) हाही लगेच माघारी परतला. ख्रिस गेलनं २० मिनिटांच्या खेळीत ९ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह १२ धावा केल्या. ४ बाद ३९ अशी अवस्था झालेल्या पॅट्रीओट्ससाठी शेर्फाने रुथरफोर्ड व ड्वेन ब्राव्हो यांनी शतकी भागीदारी केली. रुथरफोर्डनं ४३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारासह ५३, तर ब्राव्होनं ३५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४७ धावा कुटल्या. फॅबियन अॅलननेही ७ चेंडूंत नाबाद १९ धावा करून संघाला ५ बाद १७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. गेलनं मारलेल्या एकमेव षटकारानं काच फुटली.   

प्रत्युत्तरात रॉयल्स संघाला ७ बाद १५४ धावाच करता आल्या. शे होप ( ४४) आणि आझम खान ( २८) यांच्या व्यतिरिक्त अन्य फलंदाज अपयशी ठरले. शेल्डन कोट्रेल व डॉमिनिक ड्रॅक्स यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. 

Web Title: Chris Gayle Smashes Window With Brilliant Straight Hit In CPL 2021, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.