मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत तुफान फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस गेलचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला. जुलै 2018 नंतर गेलने फेब्रुवारी 2019मध्ये विंडीजच्या वन डे संघात पुनरागमन केले. घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत गेलने इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांत 424 धावा चोपल्या आणि त्यात दोन शतकं व एका अर्धशतकाचा समावेश होता. त्यामुळे त्याला वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आले. आता गेलच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विंडीजच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात गेल उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ख्रिस गेलच्या खांद्यावर नवी जबाबदारी, विंडीजच्या वर्ल्ड कप मोहिमेत निभावणार 'ही' भूमिका
ख्रिस गेलच्या खांद्यावर नवी जबाबदारी, विंडीजच्या वर्ल्ड कप मोहिमेत निभावणार 'ही' भूमिका
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत गेल नव्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:20 IST