Join us  

RECORD ALERT! ख्रिस गेलनं रचला इतिहास; ११ चेंडूंत चोपल्या ५८ धावा, ट्वेंटी-२० पूर्ण केल्या १४,००० धावा!

WI vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात गेलच्या फटकेबाजीनं वेस्ट इंडिज संघाला सहज विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:21 AM

Open in App

४१ वर्षीय ख्रिस गेल आजही ट्वेंटी-२० फॉरमॅटचा युनिव्हर्स बॉस आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात गेलच्या फटकेबाजीनं वेस्ट इंडिज संघाला सहज विजय मिळवून दिला. पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजनं ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात गेलनं ३८ चेंडूंत ६७ धावांची खेळी केली आणि यासह त्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्लाही पार केला. ट्वेंटी-२०त १४ हजार धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ( Chris Gayle  became the first batsman all across the globe to register 14,000 runs in T20 cricket alone) 

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत गेलला ४ व १३ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती, परंतु त्यानं तिसऱ्या सामन्याती स्फोटक खेळीनं सर्वांची बोलती बंद केली. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४१ धावा केल्या. कर्णधार अॅरोन फिंच ( ३०), मोईजेस हेन्रीक्स ( ३३) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इथवर मजल मारली. हेडन वॉल्शनं दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात आंद्रे फ्लेचर ( ४) व लेंडल सिमन्स ( १५) हे झटपट माघारी गेल्यानंतर गेल व कर्णधार निकोलस पूरन यांनी ऑसी गोलंदाजांचा समाचार घेतला. गेलनं ७ षटकार व ४ चौकारांच्या मदतीनं ३८ चेंडूंत ६७ धावा केल्या. पूरन ३२ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजनं १४.५ षटकांत ४ बाद १४२ धावा करून विजय मिळवला. ( Chris Gayle storm helps West Indies register series clinching win over Australia) 

गेलं सामन्याच्या ९व्या षटकात अॅडम झम्पाला खणखणीत षटकार खेचून १४ हजार धावा पूर्ण केल्या. गेलनंतर सर्वाधिक धावांच्या यादीत वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड १०,८३६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तानचा शोएब मलिक ( १०७४०), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ( १००१७) आणि भारताचा विराट कोहली ( ९९९२) यांचा क्रमांक येतो.   

टॅग्स :ख्रिस गेलवेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया