Join us

हरभजन सिंग जगासमोर भारताची नकारात्मक छबी पसरवतोय; चिनी पत्रकाराची टीका 

.देशातील सर्व स्तरांमधून चीनचा निषेध करून चीन आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 15:35 IST

Open in App

लडाखमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी आणि परवा गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे .देशातील सर्व स्तरांमधून चीनचा निषेध करून चीन आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) त्यांच्या चिनी प्रायोजकांवर बहिष्कार घालतील का, हा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे. त्यात भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनंही चिनी वस्तूंवर बंदीची मागणी केली. त्याच्या या मागणीवर चिनी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे मुख्य संपादक ह्यू झिजींग यांनी टीका केली.

हरभजन सिगनं ट्विट केलं की,''शरीर आणि राष्ट्र दोघांचं आरोग्य जपण्यासाठी एकच उपाय आहे. 'चीनी बंद'; शरीरासाठी " देसी गुड" आणि राष्ट्रासाठी "देसी Goods"  भज्जीच्या या ट्विटवर चिनी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे मुख्य संपादक ह्यू झिजींग यांनी टीका केली. त्यांनी ट्विट केलं की,''चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी अनेक सेलिब्रेटी करत आहेत. त्यात भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचाही समावेश आहे. त्याचे हे वत्यव्य म्हणजे जगासमोर भारतीय संस्कृतीची नकारात्मक छबी पसरवण्याचे काम आहे.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

प्रेग्नंट प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याची खटपट; स्पेशल गिफ्ट पाहून नताशा म्हणते...

भारतीयांवर भडकली 'पॉर्न स्टार' रेनी ग्रेसी; दिली कायदेशीर कारवाईची धमकी!  

माझं घरच तू होतीस गं... आईच्या निधनानंतर SRHच्या क्रिकेटपटूला दुःख अनावर

सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार, पण...

रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!

टॅग्स :हरभजन सिंगचीन