कौंटी क्रिकेट गाजवलं, चेतेश्वर पुजाराने केली १०० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

एकीकडे भारतात आयपीएलचा धडाका सुरू असताना, दुसरीकडे पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट गाजवत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:56 AM2022-05-02T07:56:27+5:302022-05-02T07:57:40+5:30

whatsapp join usJoin us
Cheteshwar Pujara Scores Second Double Century In Three County Matches equals the record made 100 years ago | कौंटी क्रिकेट गाजवलं, चेतेश्वर पुजाराने केली १०० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

कौंटी क्रिकेट गाजवलं, चेतेश्वर पुजाराने केली १०० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : भारताच्या अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा संघात पुनरागमन करण्यासह आपले स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी तो सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. एकीकडे भारतात आयपीएलचा धडाका सुरू असताना, दुसरीकडे पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट गाजवत आहे. पुजाराने तब्बल शंभर वर्षे जुना विक्रम मोडला.

पुजाराने ससेक्सकडून पाच डावांमध्ये दोन द्विशतके ठोकताना एक शतकही झळकावले. शनिवारी त्याने डरहॅमविरुद्ध द्विशतक ठोकत नवानगरचे महाराजा रणजितसिंग यांच्या शंभर वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ द्विशतके झळकावणारा पुजारा केवळ दुसरा भारतीय ठरला.


पुजाराने कौंटी स्पर्धेत पहिल्या सामन्यात डर्बियाशायरविरुद्ध (नाबाद २०१) द्विशतक ठोकले. यानंतर त्याने वॉर्कशायरविरुद्ध (१०९) शतक झळकावले. यानंतर त्याने शनिवारी डरहॅमविरुद्ध ३३४ चेंडूंत २४ चौकारांसह २०३ धावा फटकावल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजितसिंग हे १५ द्विशतके ठोकणारे पहिले फलंदाज ठरले होते. पुजाराने सौराष्ट्र, भारत अ, भारत ब्ल्यू आणि भारतीय संघाकडून खेळताना एकूण १३ द्विशतके ठोकली आहेत. यामध्ये आता कौंटी क्रिकेटमधील दोन द्विशतकांची भर टाकून पुजाराने रणजितसिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

अझरुद्दीनलाही गाठले!  
कौंटी क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावण्याच्या मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशीही पुजाराने बरोबरी केली. अझरुद्दीनने डर्बिशायरकडून खेळताना १९९१ मध्ये लिचेस्टरशायरविरुद्ध २१२ धावा, तर १९९४ मध्ये डरहॅमविरुद्ध २०५ धावा केल्या होत्या.

Web Title: Cheteshwar Pujara Scores Second Double Century In Three County Matches equals the record made 100 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.