Cheteshwar Pujara Retires : भारताचा कसोटीपटून चेतेश्वर पुजारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. १०३ कसोटी सामन्यातील १७६ डावात ७ हजार १९५ धावा करणाऱ्या पुजाराने आपल्या या कसोटी कारकिर्दीत द्विशतकासह अनेक दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. पण पुजारा म्हटलं की, पटकन आठवतो टीम इंडियाचा तो ऑस्ट्रेलिया दौरा. मैदानात नांगर टाकून तग धरण्याची कमालीची क्षमता असल्याचे या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाच्या मैदानात जे धैर्य दाखवलं ते अविस्मरणीयच आहे. २०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याची इनिंग एकदम खास होती. ब्रिस्बेन येथील गाबा कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करताना अंगावर चेंडू झेलत तो मैदानात थांबला अन् त्याच्या या इनिंगमुळे कांगारुंच्या ताफ्याचे मनसुबेच धुळीस मिळाले होते.
फिफ्टीसाठी २०० पेक्षा अधिक चेंडू खेळला
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या ३२८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून शुबमन गिलच्या भात्यातून १४६ चेंडूत आलेली ९१ धावांची खेळी आणि रिषभ पंतनं १३८ चेंडूचा सामना करत केलेल्या नाबाद ८९ धावांच्या खेळीशिवाय पुजारानं संयमी अर्धशतक झळकावले होते. २११ चेंडूचा सामना करताना त्याने ५६ धावांची खेळी केली होती.
- ५० चेंडूत - ८ धावा
- १०० चेंडूत -२४ धावा
- १५० चेंडूत - ३९ धावा
- २०० चेंडूत - ५५ धावा
- २०११ चेंडूत - ५६ धावा
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक माऱ्यासह त्याला सुजवण्याचा डाव खेळला, पण..
न
घरच्या मैदानात बादशहात कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाजांनी पुजाराला सुजवण्याचा डाव खेळला. यात पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड ही जोडी सर्वात आघाडीवर होती. या दोघांनी आखूड टप्प्याच्या उसळत्या चेंडूवर कधी पुजाराच्या बरगडी गवसून छातीवर वार केला. कधी चेंडू खांदा अन् हाताच्या बोटांवर जाऊन लागला. वेगाने आलेल्या चेंडूचा शरीरावरील मारा सहन करताना पुजारा वेदनेनंं व्याकूळ झाल्याचंही दिसलं. काही चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळले. हे सगळ सहन करत पुजारा धैर्यानं मैदानात तग धरून उभा राहिला. त्याच्या जिगरबाज अंदाजामुळे दुसऱ्या बाजूला पंतला हिंमतीन खेळणं सहज सोपं झालं अन् भारतीय संघाने हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा गाबातील घमंड मोडत इतिहास रचला.
Web Title: Cheteshwar Pujara Retires When As Batsman Braves Short Ball Barrage Sustains Body Blows At The Gabba Brisbane Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.