Join us
Daily Top 2Weekly Top 5

चूक सहकाऱ्यांची अन् निलंबन चेतेश्वर पुजाराचे; एका सामन्यासाठी मैदानाबाहेर अन् १२ गुण वजा

चेतेश्वर पुजाराला ECB (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) ने वर्तनाचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 12:36 IST

Open in App

चेतेश्वर पुजाराला ECB (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) ने वर्तनाचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे. ससेक्स कौंटी क्रिकेट क्लबचा कर्णधार असलेल्या पुजाराला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. ससेक्सला वर्तन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १२  गुण वजा करण्यात आले आहेत. पुजाराच्या एका सामन्याच्या निलंबनामागील कारण म्हणजे त्याचे दोन सहकारी जॅक कार्सन आणि टॉम हेन्स यांनी अखिलाडूवृत्ती दाखवली.  

ससेक्स विरुद्ध लीसेस्टरशायर सामन्यादरम्यान ही घटना घडली. पुजाराने ECB च्या व्यावसायिक आचार नियमांचे उल्लंघन केले नसले तरी, कार्सन आणि हेन्सच्या वर्तनावर अंकुश ठेवण्यात त्याचे अपयश, हे त्याच्या निलंबनाचे कारण आहे.  ईसीबीने या घटनेनंतर एक निवेदन जारी केले आणि चेतेश्वर पुजाराच्या एका सामन्याच्या निलंबनामागील कारण तपशीलवार सांगितले की,''व्यावसायिक आचार नियमांचे विनियम ४.३० असे नमूद करते की ज्या कर्णधाराला निश्चित दंड प्राप्त झाला त्या सर्व सामन्यांमध्ये एकाच व्यक्तीने संघाचे नेतृत्व केले असेल, तर कर्णधाराला एका सामन्यासाठी आपोआप निलंबन केले जाईल.

  पुजाराचे निलंबन आणि १२ गुणांच्या कपातीव्यतिरिक्त, हेन्स आणि कार्सन यांना १९ सप्टेंबर रोजी डर्बीशायरविरुद्ध ससेक्सच्या पुढील सामन्यातून वगळण्यात आले आहे. पॉइंट डिडक्शन आणि ससेक्सच्या वर्तनावर, ईसीबीने म्हटले की, संघासाठी हा एक वेगळा गुन्हा असेल असे नियम ठरवतात: “कोणत्याही हंगामात नोंदणीकृत क्रिकेटपटू एकाच प्रथम श्रेणी कौंटीमध्ये नोंदणीकृत किंवा चॅम्पियनशिपमध्ये त्या संघासाठी खेळत असताना, ४ किंवा अधिक निश्चित दंड प्राप्त करतात”.

टॅग्स :चेतेश्वर पुजाराकौंटी चॅम्पियनशिप