Join us
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण; कुटुंबीयांची होणार टेस्ट!

चौहान यांच्या कुटुंबीयाची कोरोना चाचणी होणार असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौहान यांना लखनौ येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 07:35 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांना कोरोना झाला आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आणखी एका दिग्गज व्यक्तीला कोरोना झाल्याचे वृत्त आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांना कोरोना झाला आहे. शुक्रवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

चौहान यांच्या कुटुंबीयाची कोरोना चाचणी होणार असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौहान यांना लखनौ येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

1969 मध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारताकडून ४० कसोटी आणि ७ वन डे सामने खेळले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली रणजी संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. १९८१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या