Join us  

चेन्नईविरूद्ध मुंबई इंडियन्स: कठीणसमयी चेहऱ्यावरचे हास्य फुलवण्यासाठी

यंदाची आयपीएल स्पर्धा मात्र वेगळी आहे आणि त्याची उत्सुकताही तितकीच वाढली आहे. आयपीएल स्पर्धा अशी आहे, जिथे गोलंदाज, फलंदाज एकमेकांच्या डोळ्यात पाहून बरोबरीचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 4:05 AM

Open in App

- हर्षा भोगले लिहितात...सप्टेंबर किंवा आॅक्टोबरमध्ये आयपीएल,कधी विचारही केला नसेल. हे असे झाले, जसे जानेवारीतच आंब्यांचा हंगाम यावा. आयपीएलचे हे नियमित सत्र नसले तरी त्याचा स्पर्धेवर काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही.यंदाची आयपीएल स्पर्धा मात्र वेगळी आहे आणि त्याची उत्सुकताही तितकीच वाढली आहे. आयपीएल स्पर्धा अशी आहे, जिथे गोलंदाज, फलंदाज एकमेकांच्या डोळ्यात पाहून बरोबरीचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात. हा संघर्ष पाहण्यासारखा असतो. जगातील दिग्गज खेळाडू क्रीडा कौशल्याच्या प्रदर्शनाने सर्व रस्ते प्रकाशमान करत असतात. यंदाही समर्थक चांगल्या खेळाडूला डोक्यावर घेतील, खेळाचा मनमुराद आनंद लुटतील.आश्चर्यामुळे अनेकांचे चेहरे लालेलाल होतील. काहींच्या डोळ्यातून अश्रूही वाहतील. काही खेळाडू चांगल्या प्रदर्शनाने सुरुवात करतील, तर काही एकामागे एक असे आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतील. एकंदरीत हा भावभावनांचा खेळ आहे.यंदाची आयपीएल खास असेल. आॅफ सिझनमध्ये ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेचे आकर्षण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यापासून अनेकांच्या जीवनात विविध संकटे आली. सध्या लोक कठीण प्रसंगातून जात आहेत. अनिश्चितता, आर्थिक अडचणी, अनेकांच्या गेलेल्या नोकºया अशा बºयाच प्रश्नांमुळे आपण चिंताग्रस्त आहोत. त्यामुळे ही वेळ आपल्या सर्वांसाठी कठीण आहे. अशा संकटसमयी थोडे का होईना आपल्या चेहºयावर हास्य फुलवण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी आयपीएल स्पर्धा आली आहे. निश्चितच, थोड्या काळासाठी का होईना, देशातील वातावरण बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक दिवशी ७.३० वाजता तुम्ही मनोरंजनाच्या दुनियेत सहभागी होऊ शकता. मी प्रत्येक वर्षी आयपीएल पाहात आलोय. यावर्षी मात्र अधिक उत्सुक आहे. कारण या खेळाची सुंदरता, स्वातंत्र्य आणि त्यातून मिळणारा आनंद आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जातो.सध्या आपल्यालाही त्याची गरज आहे. स्पर्धेत एखादा संघ जिंकेल, काही खेळाडू नवे विक्रम रचतील, जी येणाºया काळात त्यांची ओळखही बनेल. त्याहीपेक्षा वेगळे म्हणजे यंदाची आयपीएल लोकांच्या चेहºयावर हास्य फुलवण्यास मदत करण्यात यशस्वी ठरली तर स्पर्धेच्या आयोजनाची कसरत यशस्वी होईल. मी तशी आशाही करतो.(टीसीएम)

 

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स