Chennai Super Kings new jersey for IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२२मध्ये दिसणार नव्या जर्सीत, पाहा Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) यांच्यातल्या सामन्याने वानखेडे स्टेडियमवरून IPL 2022 ला सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:07 AM2022-03-23T11:07:40+5:302022-03-23T11:09:04+5:30

whatsapp join usJoin us
Chennai Super Kings unveiled their jersey for IPL 2022, Watch Video  | Chennai Super Kings new jersey for IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२२मध्ये दिसणार नव्या जर्सीत, पाहा Video 

Chennai Super Kings new jersey for IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२२मध्ये दिसणार नव्या जर्सीत, पाहा Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Chennai Super Kings new jersey for IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) यांच्यातल्या सामन्याने वानखेडे स्टेडियमवरून IPL 2022 ला सुरूवात होणार आहे. पण, CSK ची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. १४ कोटींचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही आणि अष्टपैलू मोईन अली ( Moeen Ali) व्हिसा न मिळाल्याने अजूनही मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे हे दोघं पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त झाला असून तो पहिल्या सामन्यात नव्या पार्टनरसह सलामीला उतरणार आहे. 

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सनं IPL 2022 साठी नव्या जर्सीचे आज अनावरण केले. मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आदी फ्रँचायझींपाठोपाठ CSKही आयपीएल २०२२ मध्ये नव्या जर्सीत दिसणार आहे.

 

ऋतुराजसोबत सलामीला कोण?
फॅफ ड्यू प्लेसिस याला लिलावात पुन्हा ताफ्यात घेण्यात अपयश आल्यानंतर CSK साठी ओपनिंगला कोण येणार याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या डोक्यात नेमकी कोणती रणनीती शिजतेच हे तोच सांगू शकतो. तो कदाचित मोईन अली यालाही ओपनिंगला पाठवू शकतो. पण, मेगा ऑक्शनमध्ये CSKने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे याला १ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले आणि तो CSKसाठी ओपनिंगचा सक्षम पर्याय ठरू शकतो. सराव सामन्यात संघाचे ऋतुराज व कॉनवे यांच्या जोडीची चाचपणी केली आहे.  कॉनवेने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ५०.१६च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. 

चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण वेळापत्रक

२६ मार्च  - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
३१ मार्च - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
३ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
९ एप्रिल -  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून 
१२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२१ एप्रिल -  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२५ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१ मे -  सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
४ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
८ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१५ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
२० मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी),  केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर  ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).
 

Web Title: Chennai Super Kings unveiled their jersey for IPL 2022, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.