CSK squad for IPL 2023: चेन्नई सुपर किंग्सचा संघ ड्वेन ब्राव्होचा पर्याय इंग्लंडच्या बेन स्टोक्समध्ये शोधला. आज त्यांनी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्यासाठी सर्वाधिक १६.२५ कोटी मोजले. स्टोक्सकडे CSK चा भावी कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे. रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवण्याचा प्रयत्न मागील पर्वात पूर्णपणे फसला... महेंद्रसिंग धोनी २०२३ मध्ये नेतृत्व जरी करणार असला तरी भविष्याचा विचार करून स्टोक्सच्या रुपाने त्यांनी सक्षम पर्याय निवडला आहे. त्यांनी ८ परदेशी खेळाडूंसह २५ खेळाडूंची फौज निवडताना खात्यात दीड कोटी रक्कम वाचवली. स्टोक्सनंतर CSK ने आज सर्वाधिक १ कोटी ही न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सनसाठी मोजले.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ -
महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.
यंदाच्या पर्वातील टॉप महागडे खेळाडू...
पंजाब किंग्स - सॅम कुरन ( १८.५० कोटी)
मुंबई इंडियन्स - कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी)
चेन्नई सुपर किंग्स - बेन स्टोक्स ( १६.२५ कोटी)
लखनौ सुपर जायंट्स - निकोलस पूरन ( १६ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद- मयांक अग्रवाल ( ८.२५ कोटी)
गुजरात टायटन्स - शिवम मावी ( ६ कोटी)
राजस्थान रॉयल्स - जेसन होल्डर ( ५.७५ कोटी)
दिल्ली कॅपिटल्स - मुकेश कुमार ( ५.५० कोटी)
सनरायझर्स हैदराबाद - हेनरीच क्लासेन ( ५.२५ कोटी)