Join us

रायुडूच्या पुनरागमनामुळे चेन्नई मजबूत, हैदराबादविरुद्ध लढत आज

ड्वेन ब्र्राव्होला संधी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:09 IST

Open in App

दुबई : फलंदाजांच्या अपयशामुळे गेल्या सामन्यांत अपेक्षित निकाल मिळविण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत सनराजयर्स हैदराबादविरुद्ध फिट खेळाडूंमुळे विजयाची आशा आहे. मुंबई इंडियनविरुद्धच्या विजयात हीरो ठरलेला सुपर किंग्सचा फलंदाज अंबाती रायुडूला स्नायूच्या दुखापतीमुळे त्यानंतरच्या दोन सामन्यांत खेळता आले नव्हते तर ब्राव्हो कॅरेबियन लीगदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना खेळता आलेला नाही.

चेन्नई व सनरायजर्स संघ सुरुवातीपासून संतुलित मानल्या जात आहेत, पण सुरुवातीला तीनपैकी दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. रायुडू फिट झाल्यामुळे त्याला फॉर्मात नसलेल्या मुरली विजयच्या स्थानी संधी मिळू शकते. ड्वेन ब्र्राव्होला संधी देण्यासाठी धोनीला शेन वॉटसन किंवा जोश हेजलवुड यांच्यापैकी एकाला बाहेर ठेवावे लागेल. सनरायजर्सचीही मधली फळी मजबूत आहे. जॉन बेयरस्टो व डेव्हिड वॉर्नरही योगदान देत आहेत.प्रत्येक संघाचा एक विजय व एक पराभव१२ सामन्यांत प्रत्येक संघाला किमान एका विजयासह किमान एक पराभवही स्वीकारावा लागला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये १३ सामन्यांनंतर प्रत्येक संघाला किमान एक विजय व एका पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रत्येक संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत.पिच रिपोर्ट । सर्व सहा सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला. खेळपट्टी काही षटकांनंतर संथ होते. त्यामुळे फलंदाजी कठीण होते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा.चेन्नई । अंबाती रायुडू व ड्वेन ब्राव्हो फिट. दीपक चाहर, हेजलवुड, कुरेन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला संथ खेळपट्टीवर उपयुक्त ठरू शकतात.हैदराबाद । केन विलियम्सनच्या समावेशामुळे मधली फळी मजबूत. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून टी. नटराजनने आशा उंचावल्या. गेल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या राशीद खानची उपस्थिती. 

टॅग्स :आयपीएलचेन्नई सुपर किंग्सIPL 2020