आयपीएलच्या गेल्या हंगामात तब्बल ८.४० कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या समीर रिझवीला लिलावापूर्वी रिलीज करण्याचा निर्णय चेन्नईला आता चांगलाच महागात पडल्याचे दिसत आहे. कारण, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना समीर रिझवी ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, हे पाहून प्रतिस्पर्धी संघाने आपल्या भुवया उंचावल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत ७० धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, दिल्ली कॅपिटल्सने समीरवर विश्वास दाखवला आणि त्याला मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याच्या मॅचविनिंग खेळीने दिल्लीला जॅकपॉट लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, २०२४ च्या लिलावात चेन्नईने समीर रिझवीवर मोठी बोली लावून संघात सामील केले. मात्र, तिथे त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत आणि ज्या मिळाल्या त्यात तो छाप पाडू शकला नव्हता. परिणामी, संघ व्यवस्थापनाने संयम गमावला आणि २०२५ च्या लिलावापूर्वी त्याला रिलीज केले. दिल्ली कॅपिटल्सने हीच संधी साधली आणि समीरला अवघ्या ९५ लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले. आज तोच समीर दिल्लीसाठी सरस कामगिरी करत आहे.
चेन्नईचे मोठे नुकसान
चेन्नईच्या मध्यफळीत सध्या एका आक्रमक भारतीय फलंदाजाची उणीव भासत आहे. समीर रिझवी हा फिरकीपटूंना उत्तम खेळतो, जे चेपॉकच्या खेळपट्टीवर चेन्नईसाठी फायदेशीर ठरले असते. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नईला एका विश्वासार्ह फिनिशरची गरज आहे. समीरने लखनौविरुद्ध नाबाद ७० धावा करून आपण तो रोल उत्तम निभावू शकतो, हे सिद्ध केले आहे. समीर केवळ २२ वर्षांचा आहे. त्याला रिलीज करून चेन्नईने आपल्या भविष्यातील एक मोठा स्टार गमावला आहे, असे आता क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
सुरेश रैनाचा वारसदार
समीर रिझवीला सुरेश रैनाचा वारसदार मानले जाते. रैनाने अनेक वर्षे चेन्नईसाठी जे काम केले, तेच काम समीर आता दिल्लीसाठी करत आहे. लखनौविरुद्ध त्याने ज्या पद्धतीने ४ षटकार ठोकले, त्यावरून त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एका चांगल्या खेळाडूला पारखण्यात चेन्नईकडून चूक झाली, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
Web Summary : Chennai's decision to release Sameer Rizvi, bought for ₹8.40 crore, now seems costly. Rizvi's impressive batting for Delhi Capitals, including a match-winning 70 against Lucknow, highlights Chennai's missed opportunity. Critics see Rizvi as Suresh Raina's successor.
Web Summary : चेन्नई का 8.40 करोड़ रुपये में खरीदे गए समीर रिज़वी को छोड़ने का फैसला अब महंगा पड़ रहा है। दिल्ली कैपिटल्स के लिए रिज़वी की प्रभावशाली बल्लेबाजी, जिसमें लखनऊ के खिलाफ मैच जिताऊ 70 रन शामिल हैं, चेन्नई के छूटे हुए अवसर को उजागर करती है। समीक्षक रिज़वी को सुरेश रैना का उत्तराधिकारी मानते हैं।