पंजाबविरुद्ध अव्वल स्थानावर चेन्नईची नजर

प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करीत अव्वल स्थान पटकाविणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आज, रविवारी आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय नोंदवून अव्वल स्थान टिकविणाºयावर भर देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:07 AM2019-05-05T06:07:45+5:302019-05-05T06:08:09+5:30

whatsapp join usJoin us
Chennai eye top position in Punjab | पंजाबविरुद्ध अव्वल स्थानावर चेन्नईची नजर

पंजाबविरुद्ध अव्वल स्थानावर चेन्नईची नजर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली - प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करीत अव्वल स्थान पटकाविणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आज, रविवारी आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय नोंदवून अव्वल स्थान टिकविणाºयावर भर देणार आहे.

मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ८० धावांनी मोठा विजय मिळविला होता. संघाचे १३ सामन्यांत १८ गुण आहेत. पंजाबविरुद्ध विजय मिळाल्यास २० गुण होतील. चेन्नईची बरोबरी करणे अन्य संघांसाठी शक्य नाही.

दिल्लीविरुद्ध धोनी आणि रैना यांनी संघाला ४ बाद १७९ पर्यंत पोहोचविले होते. दिल्ली संघाचा त्यांनी ९९ धावांत खुर्दा उडविला. रवींद्र जडेजा आणि इम्रान ताहिर यांनी सामन्यात सात फलंदाज टिपले. धोनी, रैना, अंबाती रायुडू, शेन वाटसन आणि फाफ डुप्लेसिस हे धावा काढण्यात पटाईत असून, ताहिर आणि हरभजन प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्रास देऊ
शकतात.
केकेआरकडून सात गड्यांनी पराभूत होताच प्ले आॅफबाहेर झालेला पंजाब प्रतिष्ठेसाठी खेळणार आहे. त्यांचे १३ सामन्यांत १० गुण असून, संघ सातव्या स्थानी आहे. स्थानिकांना आनंदी करण्यासाठी पंजाबने किमान हा सामना जिंकावा, असे चाहत्यांना वाटते. ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्याकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा असेल.
याशिवाय सॅम कुरेन, मयंक अग्रवाल आणि निकोलस पूरन यांनादेखील जबाबदारीने खेळावे लागणार आहे. गोलंदाजीची भिस्त रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्या खांद्यावर असेल. स्थानिक मैदानावर शेवटचा सामना जिंकण्याचा पंजाबचा प्रयत्न असेल.

मुंबई अग्रस्थानासाठी लढणार
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आज, रविवारी मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्स दरम्यान सामना रंगणार आहे. मुंबई प्लेआॅफसाठी आधीच पात्र ठरला आहे, तर केकेआरला हा सामना जिंकावाच लागणार आहे. विजयामुळे त्यांना चौथे स्थान मिळण्याची शक्यता आहे.
ख्रिस लिन आणि शुभमन गिल चांगले फलंदाजी करीत आहेत आणि आंद्रे रसेलने फलंदाजीत दिलेल्या बढतीला चांगलाच न्याय दिला आहे. मुंबईच्या अनुभवी लसिथ मलिंगा, जसप्रित बुमराह, कृणाल पांड्या यांना रसेलला थोपविण्याचे काम करावे लागेल. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा विजय त्यांना गुणतालिकेतील क्रम ठरविण्यास मदत करेल. यामुळे प्ले आॅफमध्ये कोण प्रतिस्पर्धी असेल यावर परिणाम होईल. मुंबईची मधली फळी वारंवार कोसळत आहे. याकडेही या सामन्यात लक्ष असेल.

Web Title: Chennai eye top position in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.