Join us

IPL 2022: “तो संघात कुठेच फिट बसत नव्हता”; सुरेश रैनाबाबत CSK ने स्पष्टच सांगितले

IPL 2022: सुरेश रैनाला संघात न घेणे हा खूप कठीण निर्णय होता, असे सीएसकेकडून सांगण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 08:45 IST

Open in App

बेंगळुरू: बहुचर्चित TATA IPL Auction 2022 अलीकडेच पार पडले. अनेक खेळाडू रातोरात कोट्यधीश झाले. मात्र, काही स्टार आणि सिनियर खेळाडू यांच्या पदरी यंदाच्या वर्षी कोणत्याच संघाचे दान पडले नाही. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे सुरेश रैना. (Suresh Raina) चेन्नई सुपर किंग्सने  (Chennai Super kings) रिलीज केल्यानंतर सुरेश रैनाला कोणता संघ ताफ्यात घेणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, तसे झाले नाही. सुरेश रैनाला संघात घेण्याबाबत कोणत्याही संघाने उत्सुकता दाखवली नाही. यासंदर्भात बोलताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून, सुरेश रैना संघात फिट बसत नव्हता, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

सुरेश रैनाच्या २ कोटी मूळ किंमतीमुळे कोणत्याच फ्रँचायझीने बोली लावली नाही. पण, तरीही रैनाला अंतिम यादीत सहभागी करून घेत CSK मुळ किमतीत का होईना आपल्या ताफ्यात घेईल, असे वाटले होते. पण, तीही आशा मावळली. हिल्या वर्षापासून असलेली 'चिन्ना-थला' (लहान भाऊ- मोठा भाऊ) जोडी म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांची जो़डी तुटली. अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी हा धक्काच होता.

तो संघात कुठेच फिट बसत नव्हता

सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्स संघाने न घेतल्याबाबत फ्रँचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी आपले मौन सोडले. सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्स संघासाठी सलगपणे चांगला परफॉर्मन्स दिला असला तरी, संघ बांधताना खेळाडूचा फॉर्म आणि टीम रचना याकडे विशेष लक्ष दिले जाते. यंदाही आम्ही यावरच भर दिला. गेल्या १२ वर्षांपासून सुरेश रैना चेन्नईसाठी चांगल्या पद्धतीने खेळला. सुरेश रैना याला वगळणे सीएसकेसाठी खूपच कठीण निर्णय होता. मात्र, टीम बांधणी आणि रचना यासाठी काय महत्त्वाचे याकडेही तुम्हाला लक्ष द्यायला हवे. यंदाच्या संघावर नजर टाकली, तर तो टीममध्ये कुठेच फिट बसत नव्हता, असे काशी विश्वनाथ यांनी सांगितले. सीएसके संघाकडून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओत काशी विश्वनाथ यांनी आपले मत मांडले आहे. 

दरम्यान, दोन दिवस चाललेल्या मेगा लिलावात सुरेश रैना दोन वेळा बोलीसाठी उपलब्ध झाला पण त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. चेन्नईच्या संघाने यंदाच्या लिलावात पुन्हा एकदा दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा यांना खरेदी केलं. शक्य तितक्या खेळाडूंना मूळ किमतीवर विकत घेण्याकडेच चेन्नईचा कल होता. पण रैनाचा फॉर्म पाहता चेन्नई आणि इतर संघांचा निर्णय योग्यच असल्याचे मत काही चाहत्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावचेन्नई सुपर किंग्ससुरेश रैना
Open in App