Join us  

२४ चेंडूंत १०६ धावा! दीपक हुडाची आतषबाजी, संघाला एकहाती मिळवून दिला विजय, Video 

Vijay Hazare Trophy Final - विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अविश्वसनीय फलंदाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 9:35 PM

Open in App

Vijay Hazare Trophy Final - विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अविश्वसनीय फलंदाजी पाहायला मिळाली. २८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचे तीन फलंदाज २३ धावांवर माघारी परतले होते, परंतु दीपक हुडा उभा मैदानावर उभा राहिला आणि त्याने कर्नाटक संघावर विजय मिळवला. राजस्थानने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि शनिवारी त्यांच्यासमोर हरयाणाचे आव्हान असणार आहे.

कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २८२ धावा केल्या. सलामीवीर समर्थ आर ( ८) व कर्णधार मयांक अग्रवाल ( १३) यांना अपयश आले. एस जे निक्की जोस ( २१), केएल श्रीजिथ ( ३७) व मनिष पांडे ( २८) हेही आज मोठी खेळी करू शकले नाहीत. अभिमन मनोहर व एमएस भांडगे यांनी कर्नाटकचा डाव सावरला. मनोहरने ८० चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९१ धावा केल्या, तर भांडगेने ३९ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा चोपल्या. 

राजस्थानचे दोन्ही सलामीवीर अभिजित तोमर व आर बी चौहान हे भोपळ्यावर बाद झाले. एम के लोम्रोरही १४ धावांवर बाद झाल्याने राजस्थानची अवस्था ३ बाद २३ अशी झाली होती. कर्णधार दीपक हुडा व करण लांबा मैदानावर शड्डू ठोकून उभे राहिला. दीपकने १२८ चेंडूंत १८० धावांची मॅच विनिंग खेळी केली. यापैकी १०६ धावा या चौकार ( १९) व षटकारांनीच ( ५) आल्या. त्याने अवघ्या २४ चेंडूंत हे वादळ आणले. करणने ११२ चेंडूंत नाबाद ७३ धावा केल्या आणि राजस्थानने ४३.४ षटकांत ४ बाद २८३ धावा करून विजय पक्का केला. 

लिस्ट ए क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ ( १८५*) याच्यानंतर सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा दीपक दुसरा भारतीय फलंदाज ठरला. विजय हजारे ट्रॉफीत बाद फेरीतील ही चौथी सर्वोत्तम वैयक्ति खेळी ठरली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये राजस्थानकडून ही सर्वोत्तम खेळी ठरली. २००६ मध्ये गगन खोडाने रेल्वेविरुद्ध नाबाद १६६ धावा केल्या होत्या.   

टॅग्स :विजय हजारे करंडकराजस्थानकर्नाटक