भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण सत्यात उतरला. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. सचिन तेंडुलकर ते विराट कोहली अनेक क्रिकेटपटूंनी या अभिमानास्पद कामगिरीसाठी इस्रोचे अभिनंदन केले.  
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.  तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे. २०१९ साली भारताच्या चांद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते.  
सचिन तेंडुलकर म्हणाला, ''विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा. इस्रो भारताचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते. विनम्र, कष्टकरी महिला आणि पुरुष एकत्र येत, आव्हानांवर मात करत आणि आपला तिरंगा उंच फडकवतात. भारताने एस सोमनाथ यांच्या  Chandrayaan3 टीमसह के सिवन यांच्या नेतृत्वाखालील चांद्रयान-2 टीमचे अभिनंदन केले पाहिजे. प्रत्येक हार्ड लँडिंगमध्ये धडे असतात जे आपल्याला सॉफ्ट लँडिंगच्या जवळ घेऊन जातात. जय हिंद! 
 
रोहित शर्मा, 
विराट कोहली, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, सुर्यकुमार यादव, इशांत शर्मा आणि झहीर खान यांनीही या अभिमानास्पद कामगिरीचे कौतुक केले.  
![]()