लाहोर: चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १६ किंवा १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येईल. भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा या सोहळ्याला उपस्थित राहील, अशी अपेक्षा पीसीबीने व्यक्त केली आहे. कर्णधारांचे फोटो शूट तसेच स्पर्धेपूर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी आयसीसीच्या सूचनांची पीसीबीला प्रतीक्षा आहे.
ही स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरू होईल. सुरक्षेच्या कारणास्तव पाकमध्ये जाण्यास नकार देणारा भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळेल. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पीसीबीला सर्व कर्णधार, खेळाडू व संघ अधिकाऱ्यांच्या व्हिसाची परवानगी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्घाटन पाकमध्येच...
व्हिसा परवानगी मिळवण्यात रोहित व अन्य भारतीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाकमध्येच होईल, असे पीसीबीने आयसीसीला कळविले आहे. पहिला सामना १९ ला असल्याने उद्घाटन सोहळा १६ किंवा १७ फेब्रुवारीला असेल, असे सूत्रांनी सांगितले.
भारतीय संघ दुबईला, तर रोहित जाणार पाकिस्तानला
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतसाठी भारतीय संघ दुबईला जात असतानाच कर्णधार रोहित शर्मा मात्र पाकमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली. याला कारण म्हणजे, स्पर्धेआधी होणारे कर्णधारांचे फोटोशूट. यासाठी रोहित पाकला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: Champions Trophy to be held on February 16 or 17, India to open against Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.