Champions League: सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या बैठकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक देशांमध्ये टी-२० लीग खेळल्या जातात. आता आणखी एक टी-२० लीग परत येणार आहे. २०१४ नंतर ही लीग बंद करण्यात आली होती. पण आता ती पुन्हा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे अनेक देशांतील फ्रँचायझी संघ या लीगमध्ये भाग घेतात. या लीगने क्रिकेट जगताचे लक्ष वेधले होते आणि टी-२० फॉरमॅटची लोकप्रियता वाढवली होती.
१२ वर्षांनंतर ही टी-२० लीग पुन्हा सुरू होणार
गेल्या दोन दशकांत टी-२० क्रिकेटने क्रिकेटचे जग पूर्णपणे बदलून टाकले आहे. रोमांचक सामने आणि मनोरंजनामुळे ही लीग चाहत्यांना प्रचंडल आवडते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी-२० चॅम्पियन्स लीग दपरत येणार आहे. यामध्ये जगभरातील टॉप टी-२० फ्रँचायझी संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये ही लीग सुरू होऊ शकते.
टी-२० चॅम्पियन्स लीगचा पहिला हंगाम २००८ मध्ये सुरू झाला होता, तर शेवटचा हंगाम २०१४ मध्ये खेळवला गेला. शेवटचा हंगाम एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने जिंकला होता. द सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील एका वृत्तानुसार, आयसीसीच्या बैठकीत सदस्यांमध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० च्या पुनरागमनावरही चर्चा झाली आहे.