दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंड संघानं फिल्डिंगमध्ये सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. त्यांना रोखून मॅच जिंकायची असेल तर फक्त उत्तम गोलंदाजी करून चालणार नाही तर त्यांच्या तोडीस तोड क्षेत्ररक्षण करण्याचे चॅलेंजसह टीम इंडिया फिल्डिंगसाठी मैदानात उतरली. न्यूझीलंडच्या डावातील चौथ्या षटकात हार्दिक पांड्यानं नो बॉल टाकला अन् न्यूझीलंडला फ्री हिट मिळाली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीनं बॉल अडवण्याऐवजी पायाने तो सीमारेषेबाहेर पाठवला. जिथं दोन एक दोन धावा मिळायला हव्या तिथं न्यूझीलंडनं चौकार मिळाला. हा सीन पाहिल्यावर अशी जिंकणार का मॅच? असा प्रश्नही क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. पण याच षटकात टीम इंडियातही सर्वोत्तम फिल्डर आहेत, याचा नराजा अक्षर पटेलनं दाखवून दिला. न्यूझीलंडचा सलामीवीर अन् मागच्या मॅचमधील शतकवीर रचिन रविंद्र हा हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर आउट झाला. पांड्याच्या विकेटमध्ये अक्षर पटेलनं सर्वोत्तम फिल्डिंगसह हातभार लावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'बापू'नं कॅच घेतला अन् रचिन फसला, हार्दिकचा आनंद गगनात मावेना
हार्दिक पांड्यानं आपल्या वैयक्तित दुसऱ्या षटकात एक नो बॉल टाकला होता. फ्री हिटवर त्याला एक चौकारही बसला होता. मात्र या षटकातील अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने विकेटचा डाव साधला. स्ट्राइकवर असलेल्या रचिन रविंद्रला या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तोन रनअप मार्क वरून पळत आला अन् चेंडू न टाकता मध्येच थांबला. त्याने पुन्हा हा चेंडू टाकल्यावर रचिन रविंद्र याने अपर कट खेळला. थर्ड मॅनला फिल्डिंग करत असलेल्या अक्षर पटेलनं पळत येऊन एक उत्तम झेल चिपत न्यूझीलंडची सलामी जोडी फोडली. 'बापू'नं टीम इंडियाच्या ताफ्यातही सर्वोत्तम फिल्डर आहेत, याची एक झलकच या कॅचसह दाखवून दिली. विकेटनंतर पांड्याचा आनंद अगदी गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाले.
आम्हीही नाही कमी, बापूनं दिली फिल्डिंगची हमी
अक्षर पटेलच्या कॅचची तुलना ही ग्लेन फिलिप्स किंवा केन विलियम्सन कॅचशी करता येणार नाही, ही गोष्ट खरी असली तरी हा कॅचही वाटतो तेवढा सोपा नव्हता. अक्षर पटेलनं या कॅचसह आम्हीही नाही कमी टीम इंडियातही सर्वोत्तम फिल्डरची नाही कमी असास काहीसा सीन क्रिएट केला आहे. या कॅचवर जाळ्यात फसला तो रचिन रविंद्र. ज्यानं न्यूझीलंडकडून आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक ४ शतके ठोकली आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी ही विकेट खूप मोलाची होती. ती मिळवून देण्यात अक्षरनं अप्रतिम झेलसह हातभार लावला.